17 November 2019 9:54 PM
अँप डाउनलोड

मुंबईत SRA अंतर्गत ५०० चौरस फुटांचे घर देणार: काँग्रेस

SRA, Congress

मुंबई : मुंबईत सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे गृहनिर्माणचा आणि फोफावत जाणारे लोंढे तसेच त्याच्या घरांचा. काँग्रेसचे सरकार केंद्रात आणि राज्यात सत्तेत येईल तेव्हा गृहनिर्माणचा प्रश्न आम्ही सर्वप्रथम मार्गी लावू त्यानुसार म्हाडा आणि एसआरए यांच्याद्वारे गृहनिर्माण प्रकल्प साकारत नागरिकांना किमान ५०० चौरस फुटांचे घर असावे, अशी आमची योजना आहे, असे काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबईत सध्या घरांचा मोठा प्रश्न आहे. आमचे सरकार आल्यास हा प्रश्न आम्ही हा प्रश्न निकाली लावू, असे देवरा म्हणाले. महागाई, बेरोजगारी,सुरक्षा आदी शहराशी तसेच सर्वसामान्य नागरिकांशी निगडित महत्वाच्या मुद्यांच्या जाहिरनाम्यात समावेश असेल, असे देवरा यांनी सांगितले.

पाचशे चौरस फुटांच्या घरासंदर्भात माझे राहुल गांधी यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनीही या कल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती देवरा यांनी दिली. या पत्रकार परिषदेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय नेते आनंद शर्मा, मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड, उर्मिला मातोंडकर उपस्थित होते.

हॅशटॅग्स

#Congress(295)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या