13 April 2021 4:41 AM
अँप डाउनलोड

बाप्पाच्या भक्तांना यंदा मंडपात ना दर्शन, ना हार-फुलेही अर्पण करता येणार

Corona crisis, BMC, Ganeshotsav guidelines

मुंबई, ११ जुलै : सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनामुळे अनेक देशांत लॉकडाऊन करण्यात आला आहे. भारतातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत. तर अनेक धार्मिक कार्यक्रम आणि उत्सवही रद्द करण्यात आले. आषाढी वारीही कोरोनाच्या सावटातच पार पडली, तर दहीहंडी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली. यंदाचा गणेशोत्सवावरही कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय अनेक मंडळांनीही घेतला आहे. अशातच यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेने नियमावली जाहीर केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भक्तांना यंदा मंडपात जाऊन गणेशमूर्तीचे दर्शन घेता येणार नाहीच, पण हार, फुलेही अर्पण करता येणार नाहीत. गणपतीची आरती, आगमन, विसर्जन कार्यक्रमांना केवळ १० कार्यकर्त्यांनाच उपस्थित राहावे लागणार आहे. तसा नियम करण्यात आला आहे. मुंबईत साधारणत: साडेबारा हजार गणेशोत्सव मंडळे असून त्यांच्यासाठी यंदाचा गणेशोत्सव तडीस नेणे ही तारेवरची कसरत ठरणार आहे.

तसेच कोरोनाचे संकट असल्याने दिवसातून तीन वेळ गणेश मंडप निर्जंतुकीकरण करावेत आणि मंडप सजावट, देखावे, रोषणाई यांना मुरड घालून मंडळातर्फे जनजागरण, रक्तदान, आरोग्य तपासणी असे कार्यक्रम आयोजित केले जावे. व्यावसायिक जाहिरातींनाही प्रतिबंध करण्यात आला आहे.

गणेशोत्सव मंडळांसाठी हमीपत्रातील अटी व नियम :

 • गणेशमूर्ती 4 फुटांपेक्षा जास्त उंचीची नको.
 • मंडपात एका वेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते राहू नयेत. मंडपात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणे बंधनकारक.
 • सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करणं बंधनकारक
 • मंडपाचे दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करावे, कार्यकर्त्यांना सॅनिटायझर उपलब्ध करून देणे.
 • बाप्पाला प्रसाद, हार, फुलं अर्पण करता येणार नाहीत.
 • मंडपाच्या लगत फुले, हार, प्रसाद यांच्या विक्रीचे स्टॉल लावता येणार नाहीत.
 • आरतीला मंडपात जास्तीत जास्त दहा कार्यकर्त्यांना प्रवेश. आगमन, विसर्जन याप्रसंगी मिरवणूक काढता येणार नाही. केवळ दहा कार्यकर्त्यांची उपस्थिती बंधनकारक.
 • मंडप सजावट, देखावे, रोषणाई यांना मुरड घालून मंडळातर्फे जनजागरण, रक्तदान, आरोग्य तपासणी असे कार्यक्रम आयोजित केले जावे.
 • भक्तांना ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करुन द्यावी लागणार
 • व्यावसायिक जाहिरातींनाही प्रतिबंध.
 • भक्तीपर किंवा अन्य कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही.
 • कमीत कमी निर्माल्य तयार होईल याची काळजी घेणे.
 • ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळून करोना रुग्ण, अन्य रुग्णांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे

 

News English Summary: This year’s Ganeshotsav is also affected by Corona. Therefore, many circles have decided to make this year’s Ganeshotsav simple. Similarly, Mumbai Municipal Corporation has announced rules for this year’s Ganeshotsav.

News English Title: Corona crisis BMC Ganeshotsav guidelines declared News Latest Updates.

हॅशटॅग्स

#GaneshChaturthi2020(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x