30 April 2025 3:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण | ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Deputy CM Ajit Pawar, Corona positive

मुंबई, २६ ऑक्टोबर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. या आधी त्यांना लागण झाल्याची माहिती येत होती. मात्र, तेव्हा त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याची माहिती त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी दिली होती. ”माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन,”,अशी माहिती स्वतः अजित पवार यांनी दिली आहे.

मागील आठवड्यात अजित पवार सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांचा प्रदेश कार्यालयात जनता दरबार होणार होता. मात्र, तो रद्द करण्यात आला होता. त्यानंतर अजित पवार यांची प्रकृती बरी नसल्याचं समोर आलं होतं. मात्र, करोना चाचणी निगेटिव्ह आल्याचंही स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, सोमवारी त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

 

News English Summary: Deputy Chief Minister Ajit Pawar has contracted corona. Earlier, he was reported to be infected. However, his son Partha Pawar had informed that his corona test was negative at that time. My corona test is positive and I am in good health. As a precautionary measure, Breach Candy has been admitted to the hospital on the advice of a doctor said DCM Ajit Pawar.

News English Title: Deputy Chief Minister Ajit Pawar tested corona positive News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या