2 May 2025 8:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

आरे कारशेडचा खर्च ४०० कोटी सांगितला | RTI मधील सत्य ७० कोटी | मग ३३० कोटी गेले कुठे

Devendra Fadanvis, Aarey car shed, Metro 3, RTI Information

मुंबई, २३ ऑक्टोबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ११ ऑक्टोबर रोजी आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेड कांजुरमार्ग हलवण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयावरून विरोधकांकडून जोरदार टीका केली होती. आरे येथील मेट्रो कारशेड कांजुरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय दुर्देवी असून तो केवळ अहंकारातून घेण्यात आला आहे, असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

दरम्यान आरे कारशेडसाठी ४०० कोटींचा खर्च करण्यात आल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता. मात्र आता माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मेट्रो प्रशासनाने दिलेल्या उत्तरामध्ये फडणवीस यांनी खर्चासंदर्भात केलेला दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट झालं आहे. आरे येथील जंगलांच्या संवर्धनार्थ काम करणारे पर्यावरणवादी झोरु भथेना यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरात आरेमध्ये सरकारने ७० कोटी रुपये खर्च केल्याची माहिती देण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता भथेना यांनी फडणवीस यांना उरलेला ३३० कोटी रुपयांचा निधी कुठे गेला असा प्रश्न विचारला आहे.

भथेना यांच्या या खुलाश्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री असताना सरकारने केलेल्या खर्चासंदर्भातील दाव्यांबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भथेना यांनी पर्यावरवादी स्टॅलिन यांच्यासोबत आरे येथे उभारण्यात येणाऱ्या कारशेडच्या खर्चाबाबत माहिती अधिकार कायद्याअंतर्गत याचिका दाखल केली होती. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने यासंदर्भात ७० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती या अर्जाला उत्तर देताना दिली आहे.

खर्च कसा झाला:

  • झाडे कापण्यासाठी ५ कोटी
  • कारशेडसाठी जमीन तयार करण्यासाठी २७ कोटी
  • ड्रेनेज लाईन आणि पाईप लाईन हटवण्यासाठी २ कोटी
  • कारशेडच्या एकूण बांधकामासाठी ३७ कोटी

 

News English Summary: Fadnavis had claimed that Rs 400 crore was spent for the Aarey car shed. But now in the reply given by the Metro administration under the Right to Information Act, it has become clear that the claim made by Fadnavis regarding the expenditure is wrong. In a reply to a RTI application filed by Zoru Bhathena, an environmentalist working for forest conservation in Aarey, it was alleged that the government had spent Rs 70 crore in Aarey. So now Bhathena has asked Fadnavis where the remaining Rs 330 crore has gone.

News English Title: Devendra Fadanvis Said Govt Spent 400 Crore on Aarey car shed depot But Metro 3 Spent Only 70 Crore as per RTI News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या