18 May 2021 10:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित? | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर
x

सध्याच्या परिस्थितीत मुंबईत येण्याचे धाडस नाही - नितीन गडकरी

Union Minister Nitin Gadkari, Mumbai Corona

मुंबई, १६ जून: मागील २४ तासांत राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आजच्या आकडेवारीनुसार राज्यात २७८६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १७८ जणांचा मृत्यू झाला. मृतांचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. यामध्ये मुंबईतील ५८ जणांचा समावेश आहे. त्यामुळे आता मुंबईसह राज्यातील आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान आणखी बिकट झाले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत सोमवारी १०६६ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५९,२०१ इतकी झाली आहे. तर राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १,१०,७४४ इतकी झाली आहे. यापैकी ५६०४९ रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत.

दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत मुंबईत येण्याचे धाडस नाही, पण ही परिस्थिती नक्कीच बदलेल, असं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. कोरोनाच्या संकटात देशात लॉकडाऊन असल्यानं उद्योगधंद्यांवर त्याचा परिमाण होत आहे. त्यावर नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे. बँकांशी संबंधित प्रश्न, मागणी आणि पुरवठ्यासह तरलतेच्या समस्या आहेत हे मी स्वीकार करतो. सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सर्वात महत्त्वाची समस्या तरलता आहे. कोरोनाच्या संकटात बाजारात तरलता वाढवणे आवश्यक आहे. त्याशिवाय आपण पुन्हा अर्थव्यवस्थेला गती देऊ शकत नाही.

तसेच कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक सुधारणा करण्यास केंद्र सरकारची भूमिका अत्यंत सकारात्मक आहे. आर्थिक सुधारणांच्या दृष्टीने सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले असून त्याचे परिणाम लवकरच दिसतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला होता.

 

News English Summary: In the current situation, there is no courage to come to Mumbai, but this situation will definitely change, said Union Roads and Transport Minister Nitin Gadkari. The corona crisis is affecting businesses as the country is in lockdown. Nitin Gadkari has commented on it.

News English Title: I do not dare to come to Mumbai today says Union Minister Nitin Gadkari News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(70)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x