12 May 2025 7:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

बार प्रकरणी: वरिष्ठ पोलिसांच्या मलईसाठी कनिष्ठ पोलिसांचा बळी?

Mumbai Police, MIDC Police Station

मुंबई : अंधेरी पूर्व येथील सरोज बारमध्ये सिंगरमहिला अश्लील हाव भाव करत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपाखाली अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यक्रात असलेल्या पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस शिपायावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस दलात वरिष्टांबद्दल असंतोषाचे वातावरण पसरलं आहे.

मुंबई पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी गुरुवारी ४ एप्रिल रोजी सदर कारवाई केली असून, निलंबित पोलीस उपनिरीक्षकाचे नाव कल्याण घाडगे तसेच पोलीस शिपाई दत्तात्रय आंबोरे अशी आहेत. अंधेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरोजबरमध्ये सिंगर म्हणून काम करणाऱ्या मुली अश्लील नृत्य करत होत्या. कांदिवली विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या गुन्हे शाखेने तेथे धाड टाकल्यानंतर सदर बाब निदर्शनास आली. त्यानंतर या पथकाने शनिवारी मध्यरात्री या बारवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या बिट क्रमांक ३ मध्ये रात्र पाळीवर कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

त्यात भर म्हणजे विनाकारण दत्तात्रय आंबोरे या एका पोलीस शिपायाला देखील निलंबित करण्यात करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्यातील कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वरिष्ठांबद्दल असंतोष निर्माण झाला आहे. तसेच सदर डान्सबार’मध्ये महिला सिंगारच्या नावाखाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छत्र छायेखाली मध्यरात्री उशिरापर्यंत सुरु असलेला डान्सबारला वास्तविक वरिष्ठ अधिकारीच जवाबदार असताना, अशा प्रकारे कनिष्ठ अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बाणवण्याचे प्रकार सूर असल्याने कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वरिष्ठांबद्दल रोष वाढत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या