22 September 2020 8:21 PM
अँप डाउनलोड

शासकीय व खासगी डॉक्टरांचाही कोरोनाने मृत्यू | आरोग्य विम्यातही सरकारकडून भेदभाव - राज ठाकरे

Raj Thackeray, CM Uddhav Thackeray, Corona Virus

मुंबई, १४ सप्टेंबर : राज्यातील करोना परिस्थिती अजूनही नियंत्रणात नसल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज २३ ते २५ हजारांहून अधिक लोकांना करोनाचा संसर्ग होत असल्याचं आकडेवारीतून दिसत आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवेवरती ताण वाढत आहे. सेवा बजावणाऱ्या शासकीय व खासगी डॉक्टरांचाही करोनामुळे मृत्यू होत असून, त्यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य विम्याच्या संरक्षणावरून आता नवा मुद्दा पुढे आला आहे. या भेदभावावरून राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून, सरकारला जबाबदारीची आठवण करून दिली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राज ठाकरे लिहितात, मला काही खासगी सेवेतील डॉक्टरांचं शिष्टमंडळ भेटायला आलं होतं. त्यांनी त्यांचे ह्या कोरोनाच्या काळातील जे अनुभव मला सांगितले, जी मेहनत ते घेत आहेत ते खरोखरच प्रशंसनीय आहे. पण त्यांनी मला सरकारी अनास्थेची जी एक घटना सांगितली, त्याने माझं मन विषण्ण झालं. मुळात जर खासगी सेवेतील डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विम्याचं कवच केंद्र सरकारच्या योजनेनुसार उपलब्ध आहे, तर राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत आहे?, याला असंवेदनशीलता नाही म्हणायचं तर काय म्हणायचं?, सरकार डॉक्टर्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार, पण सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार हे कसं चालेल? चूक आहे.

माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, तुम्ही या विषयांत तात्काळ लक्ष घाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन खासगी सेवेतील असो वा सरकारी सेवेतील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी असोत यांच्या अर्जांवर तात्काळ कार्यवाही करा. आपण या विषयांत डॉक्टर्सना आणि त्यांच्या कुटुंबीयांना योग्य न्याय द्याल, अशी मला आशा आहे.

 

News English Summary: Both government and private doctors are dying due to corona, and a new issue has arisen over the protection of health insurance offered to them. MNS Chief Raj Thackeray has written a letter directly to Chief Minister Uddhav Thackeray regarding this discrimination and reminded the government of its responsibility.

News English Title: MNS Chief Raj Thackeray write a letter to CM Uddhav Thackeray Maharashtra Coronavirus Marathi News LIVE latest updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#RajThackeray(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x