27 September 2020 3:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
शिवसेनेसोबत सरकार बनवण्याचे कारणच नाही | मुलाखतीपूर्वी फडणवीसांच्या राऊतांना अटी सामान्यांची लूट आणि राज्यातील मंत्र्यांना ५ महिने वीजबिलंच नाही | मनसेकडून संताप सामान्यांची लूट आणि मंत्र्यांशी सेटलमेंट? राज्यातील १५ मंत्र्यांना ५ महिने वीजबिलंच नाही खोट्या कागदपत्रांद्वारे ट्रॅफीक पोलिसांना फसवणं विसरा | तुमची सर्व कागदपत्रं पोलिसांकडे मुंबईतील महिलांसाठी आनंदाची बातमी | प. रेल्वेवर लेडीज स्पेशल ट्रेन सुरु होणार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, कठोर नियमांना तयार राहा - मुख्यमंत्री समविचारी पक्ष असल्याने युतीत निवडणूक लढवली | आता भाजपशी वैचारिक मतभेदांचा साक्षात्कार?
x

मिम्सवरून खिल्ली | कंगनावर विरोधी पक्षनेतेपदाची जवाबदारी सोपवून फडणवीस बिहारला

Opposition leader Devendra Fadnavis, Bihar tour, Bihar Assembly Election 2020, Marathi News ABP Maza

मुंबई, १३ सप्टेंबर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बिहारसाठी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. फडणवीस यांच्यावर केंद्रीय नेतृत्वाकडून अन्य राज्याच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी प्रथमच दिली दिली आहे. ज्येष्ठ भाजप नेते भूपेंद्र यादव हे बिहारसाठी पक्ष प्रभारी असून फडणवीस हे त्यांच्यासमवेत निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहतील, असे दिल्लीतुन भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं होतं आणि त्याप्रमाणेच झालं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, बिहार विधानसभेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत असून भाजपने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. संयुक्त जनता दलाबरोबर भाजप निवडणूक रिंगणात उतरणार असून मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आधीच जाहीर केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात एकूण वातावरण पाहता कंगना रानौतने एखादा विषय ट्विरवर राज्य सरकारला अनुसरून उचलावा आणि राज्यातील भाजपच्या नेत्यांनी त्यावर रान उठवावं असाच काहीसा दिनक्रम पाहायला मिळत आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर अनेक मिम्स शेअर होतं असून त्याचा संदर्भ फडणवीसांशी जोडणं सुरु झालं आहे. फडणवीस विरोधी पक्षनेत्यांची जवाबदारी कंगना रानौतवर सोपवून बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाल्याचे मिम्स व्हायरल होतं आहेत.

 

News English Summary: Former Chief Minister Devendra Fadnavis has been appointed in-charge of elections for Bihar. Fadnavis’ name was sealed at a meeting of party leaders. For the first time, Fadnavis has been given the responsibility of election charge of another state by the central leadership.

News English Title: Opposition leader Devendra Fadnavis on Bihar tour for Bihar Assembly Election 2020 Marathi News LIVE latest updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x