18 May 2021 9:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित? | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर
x

मुंबई ९/११ हल्ला: त्यानंतर मी 'लादेनला' दम दिला होता; मनसे नेत्याकडून राऊतांची खिल्ली

Dawood Ibrahim, MP Sanjay Raut, MNS Leader Sandeep Deshpane

मुंबई: मी दाऊद इब्राहिमला दम भरला आहे, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्यांना कानपिचक्या लगावण्यात आल्या आहेत. मी ओसामा बिन लादेनशी बोललो होतो, असं ट्वीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. तर मनसैनिकांनी आपली गाडी जाळल्याचं संजय राऊतांनी सांगितल्यावर, राज ठाकरेंकडून तुम्ही नवीकोरी गाडी घेतली होतीत, अशी आठवण देखील देशपांडेंनी करुन दिली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पुण्यामध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात राऊतांनी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिले. यावेळेस पत्रकारितेतील आपल्या कारकिर्दीबद्दल बोलताना संजय राऊत, “मी दाऊद इब्राहिम पासून अनेकांचे फोटो काढले आहेत. दाऊद इब्राहिमला दम देखील दिला आहे,” असं म्हणाले. त्याचबरोबर “बाळासाहेब ठाकरे माझी फायर ब्रँड एडिटर अशी अनेक ओळख करून द्यायचे,” अशी आठवणही यावेळी खासदार संजय राऊत यांनी करुन दिली.

मी दाऊदला दम दिला होता असं सांगणाऱ्या संजय राऊत यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी #फेकाडासामनेवाला अशा हॅशटॅगने खिल्ली उडवली आहे. आपण काही सांगायला काय जातंय असाच काहीसा तोरा संजय राऊत यांचा असतो असंच काहीसं चित्र आहे. त्यालाच अनुसरून संदीप देशपांडेंनी राऊतांची खिल्ली उडवणार ट्विट केलं आहे.

खासदार समाज राऊत यांनी महाराष्ट्र सैनिकांनी गाडी फोड्याची आठवण करुन दिल्यानंतर देशपांडे यांनी यावरुनही राऊतांना सुनावले आहे. “ज्या महाराष्ट्र सैनिकांनी तुमची गाडी जाळली होती त्यांचा आम्हाला अभिमान आहे .आमच्या ‘दिलदार राजाकडून’ तुम्ही नवी कोरी गाडी देखील घेतली होती,” अशी आठवण देशपांडे यांनी राऊतांना करुन दिली आहे. याच ट्विटच्या शेवटी देशपांडे यांनी #फेकाडासामनेवाला हा हॅशटॅगही वापरला आहे.

 

Web Title:  MNS leader Sandeep Deshpande Slams Shivsena MP Sanjay Raut over Dawood Ibrahim comment.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(664)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x