1 May 2025 10:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN
x

गुजरातच्या माजी गृहमंत्र्यांवर आरोप करणारे IPS संजीव भट्ट जेलमध्ये | परमवीर सिंह कोर्टात आणि भक्त...

Mumbai congress, MLA Bhai Jagtap, BJP, Parambir Singh

मुंबई, २३ मार्च: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याच्याकडे दरमहा १०० कोटी रुपये मागितले होते, असा धक्कादायक आरोप गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीरसिंग यांनी केला होता. अँटिलिया स्फोटके आणि सचिन वाझे प्रकरणावरून नुकतेच परमबीर यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटवण्यात आले आहे. परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून यामध्ये थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. पत्राची प्रत त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही पाठवली आहे. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे.

त्यानंतर परमबीर सिंग यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आपण जे आरोप केले आहेत. त्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी सिंग यांनी या याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेत आपण केल्या सर्व आरोपांची चौकशी करावी. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख आणि वसुली प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ​​​​​​मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. परमबीर यांनी पत्रात लिहिलेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. एकूण 130 पानांची याचिका परमबीर सिंह यांनी दाखल केली आहे.

दरम्यान, पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांच्याकडून हे आरोप झाले. डांगे यांनी फेब्रुवारीत राज्याच्या अतिरिक्त गृह सचिवांना पत्र लिहिले होते. यात परमबीरसिंग यांच्या अंडरवर्ल्डशी संबंधांचा खुलासा केला होता. आता याच विषयाला अनुसरून आणि गुजरातमधील तत्कालीन आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनी गुजरातच्या तत्कालीन गृहमंत्र्यांवर केलेले आरोप आणि नंतर त्यांना देण्यात आलेला त्रास याप्रकरणाची भाई जगताप यांनी भाजपाला आठवण करून दिली आहे. यावरून भाजप उच्च पदावरील अधिकाऱ्यांना स्वतःच्या सोयीनुसार कसं वापरतं याची देखील आठवण करून दिली आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे, “गुजरातच्या तत्कालीन गृहमंत्र्यांवर आरोप करणारे आयपीएस संजीव भट्ट जेलमध्ये…परमवीर सिंह कोर्ट फिरतायत…आणि भक्त लोकशाही वर ज्ञान पाजळतायत..!!

 

News English Summary: A petition has been filed in the Supreme Court by Parambir Singh. The allegations you have made in your letter to the Chief Minister. Singh has demanded an inquiry into the allegations. All the allegations made by you in this petition should be investigated. Parambir Singh has demanded a CBI probe into the Anil Deshmukh and recovery case

News English Title: Mumbai congress president Bhai Jagtap criticised BJP over politics on Parambir Singh news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BhaiJagtap(9)#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या