3 May 2025 10:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राच्या बदनामीचे कारस्थान | पण ते यशस्वी होणार नाहीत

NCP MLA Rohit Pawar, Bihar Assembly Election 2020, Marathi News ABP Maza

मुंबई, १४ सप्टेंबर : भारतीय जनता पक्ष बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सुद्धा बिहारच्या दौऱ्यावर गेले आहेत. सध्या राज्यातील वातावरण कंगना रानौतच्या विवादित मुद्यावरून ढवळून निघालं आहे. प्रसार माध्यमांवर देखील कंगना प्रत्येक मिनिटाला ट्विट करून महाराष्ट्रात वाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून विरोधक म्हणजे भाजप केवळ बिहार निवडणुकीसाठी सुशांत आणि कंगनाचा मुद्दा उचलून महाराष्ट्राला बदनाम करत असल्याचा आरोप करण्यात येतो आहे. त्यालाच अनुसरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाला लक्ष केलं आहे.

“बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच महाराष्ट्राला दूषणे दिली जात आहेत अस दिसतंय परंतु आपली जनता सुज्ञ आहे, विरोधकांचा ‘पॅटर्न’ सर्वांच्या लक्षात आलेला आहे. पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याच काम विरोधकांनी बंद करावं, महाराष्ट्रात त्यांचा हा ‘पॅटर्न’ कधीच यशस्वी होणार नाही” असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे. सोशल मीडियावरून रोहित पवार यांनी याबाबतची पोस्ट शेअर केली आहे.

“धर्मा पाटील या शेतकरी आजोबांना भाजप सरकारच्या काळात आपल्याला न्याय मिळत नसल्यामुळे मंत्रालयात आत्महत्या करावी लागली. हे एक उदाहरण झालं, आज सुद्धा बिहार, उत्तरप्रदेश या भाजपशासित राज्यात बलात्कार,खून सारखे गुन्हे दिवसाढवळ्या घडत आहेत,सरकार विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना गाडीखाली चिरडून मारलं जात आहे. अशा वेळी पीडितांना न्याय देण्याची साधी मागणी न करणारे भाजपचे नेते, कार्यकर्ते महाराष्ट्रात मात्र आक्रमक होतात. आपलं महाविकास आघाडी सरकार हे न्यायाच्या बाजूने उभा राहणार सरकार आहे, मात्र काही लोकांचा दुर्दैवाने पीडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांचा उपयोग करून हे सरकार डळमळीत करण्यात रस आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरण असो किंवा नागरिकाला झालेली मारहाण या प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई सुरू केलेली आहे.”

 

News English Summary: For the past few days, the opposition has been accused of defaming Maharashtra by raising the issue of Sushant and Kangana only for the Bihar assembly elections 2020. Following that, NCP MLA Rohit Pawar has turned his attention to BJP.

News English Title: NCP MLA Rohit Pawar slams BJP over Bihar Assembly Election 2020 politics Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या