5 May 2024 12:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

या नेत्यांची भाषणं ऐकायला व पाहायला लोक येतात; पवारांची महामोर्चा'वर प्रतिक्रिया

MNS Maha Morcha, Raj Thackeray, NCP President Sharad Pawar

मुंबई: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा विजय झाला. या विजयामुळे मला वैयक्तिकरित्या आश्चर्य वाटत नाही. हा विजय निश्चित होताच. यापूर्वी इतर काही राज्यात भाजपचा पराभव झाला होता. त्यानंतर आता दिल्लीतही पराभव झाला आहे. त्यामुळे आता भाजपच्या पराभवाची मालिकाच सुरु झाली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगितले. दिल्लीत आपचा विजय झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून आतापर्यंतचे कल पाहता आम आदमी पक्षानं दिल्ली पुन्हा राखल्याचं चित्र आहे. सीएए, एनआरसीसारख्या राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून भाजपनं दिल्लीत जोरदार प्रचार केला होता. भाजपची सत्ता येणारच असा दावा निकालाच्या आदल्या दिवसापर्यंत सुरू होता. मात्र, भाजपची पुरती पीछेहाट झाली आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार आम आदमी पक्ष ६२ जागी तर, भाजप अवघ्या ८ जागी आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातून दिल्लीच्या निकालावर प्रतिक्रिया येत आहेत.

पुण्यात झालेल्या या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना राज ठाकरेंच्या ९ फेब्रुवारीच्या भाषणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. महाराष्ट्रातला एक नेता दगडाच्या बदल्यात दगड आणि तलवारीच्या बदल्यात तलवारीने उत्तर देईल अशी भाषा करतो आहे त्याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले, “काही लोकांची वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते जे बोलून गेले.. या नेत्यांची भाषणं ऐकायला आणि पाहायला लोक येतात” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 

Web Title: NCP President Sharad Pawar talked on MNS Party Maha Morcha organised at Mumbai.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x