4 December 2024 2:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: VEDL Investment Tips | असा वाढेल पैशाने पैसा, तुमच्याकडील पैसे पुन्हा होतील डबल; या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा - Marathi News Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केट'मध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल - GMP IPO 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगा'बाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SUZLON Horoscope Today | काहींचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल तर काहींना मिळेल यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य
x

लोकांना ८ तास ड्युटी | ८ तास प्रवास | मुंबईकरांसाठी उद्या मनसेचं लोकल प्रवास आंदोलन

Railway Pravasi Mahasangh, MNS protest, Start Mumbai local, Marathi News ABP Maza

मुंबई, २० सप्टेंबर : मुंबई व आसपासच्या परिसरातील नोकरदार व कष्टकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारनं लोकल सुरू करावी या मागणीसाठी मनसेनं पुकारलेल्या ‘सविनय कायदेभंग’ आंदोलनाला उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था या संघटनेनं पाठिंबा दिला आहे. रेल्वे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतरही मनसे हे आंदोलन करण्यावर ठाम आहे.

रेल्वे पोलिसांनी कारवाईचा इशारा देऊनही मनसे आपल्या निर्णयावर ठाम आहे. कायदेशीर कारवाईला आम्ही तयार असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. शिवसेनेची आंदोलन झाली, त्यांना नोटीसा नाही, मात्र आम्हाला लगेच नोटीस देण्यात आली ही दडपशाही असल्याचंही ते म्हणाले.

आठ तास ड्युटी आणि आठ तास प्रवास असे लोकांचे हाल सुरु आहेत हे मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का? अनिल परब एसटी 100 टक्के चालू करत आहेत. कोरोनाने अनिल परब यांच्या कानात सांगितलं आहे का की, एसटी सुरु झाल्यास कोरोना होणार नाही आणि रेल्वे सुरु झाल्यास होणार, असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्यास राज्य सरकारचा विरोध आहे. अत्यावश्यक सेवेतील व अन्य काही कर्मचाऱ्यांना रेल्वे सेवेला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यामुळं मुंबईकरांच्या प्रवासाचा प्रश्न सुटलेला नाही. रिक्षा, टॅक्सी व अन्य पर्याय लोकांना परवडणारे नाहीत. बेस्ट बस सेवेवर अतिरिक्त ताण येत आहे. लोकांचे प्रचंड हाल होत आहेत.

 

News English Summary: Suburban Railway Passengers Ekta Sanstha has supported the MNS’s call for a ‘civil disobedience’ movement for the government to start locomotives for the benefit of employees and laborers in and around Mumbai. The MNS is adamant on agitating even after the railway police issued a notice.

News English Title: Railway Pravasi Mahasangh support MNS protest to start Mumbai local Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x