18 May 2024 11:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

मुंबईत कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव | BMC ने 1,305 इमारती सील केल्या

BMC, Sealed buildings, Corona crisis

मुंबई, २० फेब्रुवारी: मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. यामुळे मुंबई पालिका अधिक सतर्क झाली असून काही नियमही लागू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईही करण्यात येणार आहे. काल मुंबईत 823 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे नव्या नियमानुसार बीएमसीने शहरातील तब्बल 1305 इमारती सील केल्या आहेत. दरम्यान, 5 हून अधिक कोरोनाग्रस्त आढळलेल्या इमारती सील करण्याचा नवा नियम पालिकेने लागू केला आहे.

ANI च्या ट्विटनुसार, मुंबई शहरात 2749 कोरोना रुग्ण आढळल्याने बीएमसीने तब्बल 1305 इमारती सील केल्या आहेत. त्यात एकूण 71,838 घरं आहेत. अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईत काल 823 रुग्ण आढळून आले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 440 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत असल्याने पालिका प्रशासनासह महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसंच नियमाचे पालन करण्याचे आवाहनही त्यांच्याकडून वारंवार केले जात आहे. लॉकडाऊनची वेळ आणून देऊ नका, अशी तंबीही प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

 

News English Summary: Over the last few days, the number of corona cases in Mumbai has been on the rise. As a result, Mumbai Municipal Corporation has become more vigilant and some rules have been enforced. Violators will also be prosecuted. 823 new corona infected patients were found in Mumbai yesterday. As per the new rules, BMC has sealed 1305 buildings in the city. Meanwhile, the municipality has enacted a new rule to seal more than 5 corona-found buildings.

News English Title: BMC has sealed 1305 buildings in the city over corona crisis again news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x