12 December 2024 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
x

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआला बलात्काराची धमकी देणाऱ्या शुभम मिश्राला अटक

Rape threat, Standup Comedian, Agrima Joshua, Swara Bhasker

मुंबई, १३ जुलै : इन्स्टाग्रामवरील शुभम मिश्रा या तरुणाने जोशुआला बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप स्वराने केला होता. यासंदर्भात तिने काही ट्विट केले असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबरच शुभम हा गुजरातचा असल्याची शक्यता असल्याने गुजरात पोलिसांनाही त्याच्यावर कारवाई करण्याची विनंती केली होती. “सर इन्स्टाग्राम इनफ्ल्यूएन्सर असणाऱ्या शुभम मिश्रा याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अग्रिमा जोशुआला बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. तसेच त्याने इतरांनाही असं करण्यास सांगितलं आहे. महाराष्ट्रात राहणारी एक महिला म्हणून अशाप्रकारे बलात्काराची धमकी देणारे मोकाट फिरत असल्याने माला भिती वाटत आहे. यासंदर्भात काहीतरी करा,” असं ट्विट स्वराने देशमुख यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्याची माहिती देणाऱ्या ट्विटवर केलं आहे.

दरम्यान, स्टँडअप कॉमेडिअन अग्रिमा जोशुआला बलात्काराची धमकी देणाऱ्या युट्यूबर शुभम मिश्राच्या विरोधात वडोदरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केलं आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. तो व्हिडिओ महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील टॅग केला होता. देशमुख यांनी मुंबई पोलीस आणि सायबर सेलला याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. शुभमच्या विरोधात कलम २९४ (अश्लिलता) ३५४ (ए), ५०४ (जाणून बुजून सार्वजनिक शांतता भंग करणे) ५०५ (भडकाऊ बोलणं) ५०६ (धमकी देणे) ५०९ (महिलेचा अपमान करण) यासारखे कलम शुभमवर लावण्यात आले.

आहेत काय आहे प्रकरण? कॉमेडिअन अग्रिमा जोशुआवर आरोप आहे की, २०१९ साली एक लाईव्ह शोदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. एकेरी उल्लेख केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गृहमंत्री देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. शुभम मिश्रा नावाच्या तरूणाने जोशुआबद्दल अपशब्द बोलले आहेत.

जोशुआचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून शनिवारी त्या कॅफेची तोडफोड करण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी जोशुआ विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.

 

News English Summary: Vadodara police have arrested Shubham Mishra, a YouTuber, for threatening to rape stand-up comedian Agrima Joshua. Actress Swara Bhaskar shared this video on Twitter.

News English Title: Rape threat to Standup comic Maharashtra home minister Anil Deshmukh seeks police action News Latest Updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x