अजान स्पर्धेशी आपला संबंध नाही | शिवसेना विभागप्रमुखांची सारवासारव
मुंबई, १ डिसेंबर: शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी मुस्लिम समाजातील लहान मुलांना नमाजची गोडी लागावी म्हणून अजान स्पर्धेचं आयोजन केलं आहे. हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या शिवसेनेने अजान स्पर्धेचं आयोजन केल्याने कालपासूनच भारतीय जनता पक्षाने टीकेची झोड उठवली.
विरोधकांनी शिवसेनेची कोंडी करण्यास सुरुवात केल्यानंतर पांडुरंग सकपाळ यांनी खुलासा करत अजान स्पर्धेशी आपला संबंध नाही असा खुलासा केला आहे. अजानमुळे मनाला शांती लाभते, लहान मुलांना अजानची गोडी लागावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन केल्याचंही सकपाळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. तसंच “महाआरतीप्रमाणेच अजानचं महत्त्व आहे. प्रेम आणि शांतीचं ते प्रतिक आहे. त्यावर वाद घालणं उचित वाटत नाही,” असं देखील ते म्हणाले होते.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत थेट शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला केला आहे. “अहो पक्षप्रमुख, खरच मर्द असाल तर सांगून टाका की तुमच्या विभाग प्रमुखाला आपली शिवसेना आता ‘सेक्युलर’ झालीये. नाहीतर ‘हो मी नामर्द आहे’ असं तरी?,”,अशा शब्दात नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे.
आहो पक्षप्रमुख..
खरच मर्द असाल.. तर सांगून टाका की तुमच्या विभाग प्रमुखला आपली शिवसेना आता “सेक्युलर”आहे..
नाहीतर “हो मी नामर्द आहे” असं तरी ?— nitesh rane (@NiteshNRane) November 30, 2020
News English Summary: After the opposition started harassing Shiv Sena, Pandurang Sakpal has revealed that he has nothing to do with Ajaan competition. Sakpal had said while talking to the media that this competition was organized to give peace of mind to the children due to Ajaan. Also, “Ajaan is as important as Maha Aarti. It is a symbol of love and peace. I don’t think it’s fair to argue about that, “he said.
News English Title: Shivsena Pandurang Sakpal Muslim children Azan competition News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News