11 May 2025 5:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
National Pension Scheme | पगारदारांना महिना 1000 रुपये गुंतवणुकीतून प्रति महिना 1 लाख रुपये फिक्स पेन्शन मिळणार Gratuity Money Amount | तुमचा महिना पगार किती? खाजगी कंपनी नोकरदारांना ग्रॅच्युईटीचे 1,06,731 रुपये मिळणार EPFO Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला महिना रु.7500, रु.6429, रु.5357 की रु.4286 पेन्शन मिळणार? अपडेट आली Horoscope Today | 11 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 11 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | खुशखबर! मल्टिबॅगर पेनी स्टॉक फोकसमध्ये, जोरदार तेजीचे संकेत - NSE: RPOWER NBCC Share Price | 28 टक्के कमाईची संधी मिळतेय, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC
x

फडणवीस दिल्लीत आल्यानंतर हे पत्र समोर आलं | पवारांच्या या प्रतिक्रियेचा अर्थ काय?

Sharad Pawar, Sachin Vaze, Parambir Singh, Anil Deshmukh

मुंबई, २१ मार्च: मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले अधिकारी परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट सचिन वाझेंना दिले असल्याचा दावा त्यांनी केला होता. दरम्यान गृहमंत्र्यांनी हे आरोप फेटाळून लावले असले तरीही राज्यात राजकीय वादळ आले आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी प्रतिक्रिया या दिली आहे.

शरद पवार याविषयी बोलताना म्हणाले की, ‘अनिल देशमुखांवर लावलेले आरोप गंभीर आहेत. परमबीर सिंह यांच्या पत्राचे दोन भाग आहेत. एक मोहन डेलकर प्रकरणावर आहे तर दुसरा वाझे प्रकरणावर आहे. दरम्यान या पत्रामध्ये देशमुखांवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

शरद पवारांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर भाष्य करत भूमिका मांडली. देवेद्र फडणवीस दिल्लीत आल्यानंतर हे पत्र समोर आलं आहे. त्या पत्रावर परमबीर सिंग यांची स्वाक्षरी नाही. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत, असं पवार म्हणाले.

पैसे गोळा कसे केले जातात हे पत्रात लिहिलेले नाही;
शरद पवार म्हणाले की, ‘परमबीर सिंहांनी मला आणि मुख्यमंत्र्यांना हे पत्र पाठवले आहे. त्यात यांनी लिहिलेय की, गृहमंत्र्यांनी दर महिन्याला 100 कोटी जमा करण्याचे टार्गेट वाझेंना दिले होते. मात्र त्यांनी या पत्रामध्ये पैसे गोळा कसे केले जातात आणि ते कुणाकडे दिले जाते यात नमूद केलेले नाही.’

 

News English Summary: Home Minister Anil Deshmukh has made sensational allegations against Parambir Singh, an officer who was removed from the post of Mumbai Police Commissioner. He had claimed that Anil Deshmukh had given a target of Rs 100 crore to Sachin Waze every month. Meanwhile, the Home Minister has denied the allegations, but there has been a political storm in the state. The demand for the resignation of the Home Minister is gaining momentum. Now NCP’s Sarvesarva Sharad Pawar has reacted to this.

News English Title: Sharad Pawar press conference over Sachin Vaze and Parambir Singh case news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या