चिदंबरम ‘हिंदू दहशतवाद’ शब्दाचे जनक : शिवसेना

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना जामीन नाकारण्यात आला असून त्यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या राउज अॅव्हेन्यू कोर्टाने गुरुवारी हा निर्णय दिला.
तीन तास कसून चौकशी केल्यानंतर सीबाआयने चिदंबरम यांना दुपारी साडेतीन वाजता राउज अॅव्हेन्यू कोर्टात आणले. यावेळी छोटय़ा कोर्ट रूममध्ये आणल्याबद्दल चिदंबरम यांनी आश्चर्य व्यक्त केले. मला वाटले, मोठय़ा कोर्टात मला आणले जाईल, अशी मिश्कील टिप्पणी चिदंबरम यांनी केली. त्यानंतर सुनावणीस सुरुवात झाली. चिदंबरम हे चौकशीला सहकार्य करत नसल्याने त्यांच्या चौकशीसाठी त्यांना पाच दिवसांची कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सीबीआयने कोर्टाला केली.
दरम्यान आजच्या सामना मुखपत्राच्या अग्रलेखात माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा समाचार घेण्यात आला आहे. ‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाचे जनक तत्कालीन गृहमंत्री चिदंबरमच होते व त्या विकृत कल्पनेचा त्यावेळी बळी ठरलेले अमित शहा, नरेंद्र मोदी हे आज दिल्लीचे सूत्रधार आहेत. प्रज्ञासिंह ठाकूर संसदेत पोहोचल्या आहेत. हा काळाने घेतलेला सूड आहे असं देखील अग्रलेखात म्हटलं आहे. चिदंबरम हे ७२ तास दिल्लीतच होते, पण सीबीआय त्यांना शोधू शकली नाही. चिदंबरम हे काँग्रेसचे नेते आहेत. चिदंबरम देशाचे माजी गृहमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. असतील हो, पण त्याचा इथे काय संबंध? ते कोणीही असतील, पण कायद्याच्या वर नाहीत. तसेच ३५०० कोटी रुपयांचा एअरसेल मॅक्सिस करार आणि आयएनएक्स मीडिया व्यवहारात ३०५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत गैरव्यवहार झाल्याचे हे प्रकरण आहे. नियमबाह्य गोष्टी या व्यवहारात झाल्याचे उघड दिसत आहे. फक्त ४.६ कोटी रुपयांची परवानगी असताना परकीय गुंतवणूक ३०५ कोटींपर्यंत पोहोचली हे गौडबंगाल काय, ते चिदंबरम आणि त्यांचे दिवटे चिरंजीव कार्ती यांनाच माहीत असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
तत्पूर्वी, काँग्रेस मुख्यालयात प्रकट झालेल्या चिदंबरम यांनी सांगितले होते, ‘आयएनएक्स घोटाळ्यात मी आरोपी नाही.’ चिदंबरम यांचे हे म्हणणे असेल तर गेले ६ महिने ते ‘जामीन’ घेऊन का वावरत होते व आरोपी नसताना अटक करून न्यायला तपासयंत्रणांना वेड लागले आहे काय? ‘‘स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलमंत्र आहे. अशा वेळी जीवन आणि स्वातंत्र्य यापैकी मला काही निवडण्यास सांगितल्यास मी स्वातंत्र्याला प्राधान्य देईन,’’ असे वक्तव्य चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात केले होते आणि त्यानंतर पुढील घटनाक्रम घडण्यास सुरुवात झाली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN