15 July 2020 11:20 PM
अँप डाउनलोड

चिदंबरम ‘हिंदू दहशतवाद’ शब्दाचे जनक : शिवसेना

Shivsena, P Chidambaram, inx mediacase, inx media case, INX Media, CBI, Court, Uddhav Thackeray, Saamana News Paper

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना जामीन नाकारण्यात आला असून त्यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या राउज अ‍ॅव्हेन्यू कोर्टाने गुरुवारी हा निर्णय दिला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

तीन तास कसून चौकशी केल्यानंतर सीबाआयने चिदंबरम यांना दुपारी साडेतीन वाजता राउज अ‍ॅव्हेन्यू कोर्टात आणले. यावेळी छोटय़ा कोर्ट रूममध्ये आणल्याबद्दल चिदंबरम यांनी आश्चर्य व्यक्त केले. मला वाटले, मोठय़ा कोर्टात मला आणले जाईल, अशी मिश्कील टिप्पणी चिदंबरम यांनी केली. त्यानंतर सुनावणीस सुरुवात झाली. चिदंबरम हे चौकशीला सहकार्य करत नसल्याने त्यांच्या चौकशीसाठी त्यांना पाच दिवसांची कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सीबीआयने कोर्टाला केली.

दरम्यान आजच्या सामना मुखपत्राच्या अग्रलेखात माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा समाचार घेण्यात आला आहे. ‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाचे जनक तत्कालीन गृहमंत्री चिदंबरमच होते व त्या विकृत कल्पनेचा त्यावेळी बळी ठरलेले अमित शहा, नरेंद्र मोदी हे आज दिल्लीचे सूत्रधार आहेत. प्रज्ञासिंह ठाकूर संसदेत पोहोचल्या आहेत. हा काळाने घेतलेला सूड आहे असं देखील अग्रलेखात म्हटलं आहे. चिदंबरम हे ७२ तास दिल्लीतच होते, पण सीबीआय त्यांना शोधू शकली नाही. चिदंबरम हे काँग्रेसचे नेते आहेत. चिदंबरम देशाचे माजी गृहमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. असतील हो, पण त्याचा इथे काय संबंध? ते कोणीही असतील, पण कायद्याच्या वर नाहीत. तसेच ३५०० कोटी रुपयांचा एअरसेल मॅक्सिस करार आणि आयएनएक्स मीडिया व्यवहारात ३०५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत गैरव्यवहार झाल्याचे हे प्रकरण आहे. नियमबाह्य गोष्टी या व्यवहारात झाल्याचे उघड दिसत आहे. फक्त ४.६ कोटी रुपयांची परवानगी असताना परकीय गुंतवणूक ३०५ कोटींपर्यंत पोहोचली हे गौडबंगाल काय, ते चिदंबरम आणि त्यांचे दिवटे चिरंजीव कार्ती यांनाच माहीत असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

तत्पूर्वी, काँग्रेस मुख्यालयात प्रकट झालेल्या चिदंबरम यांनी सांगितले होते, ‘आयएनएक्स घोटाळ्यात मी आरोपी नाही.’ चिदंबरम यांचे हे म्हणणे असेल तर गेले ६ महिने ते ‘जामीन’ घेऊन का वावरत होते व आरोपी नसताना अटक करून न्यायला तपासयंत्रणांना वेड लागले आहे काय? ‘‘स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलमंत्र आहे. अशा वेळी जीवन आणि स्वातंत्र्य यापैकी मला काही निवडण्यास सांगितल्यास मी स्वातंत्र्याला प्राधान्य देईन,’’ असे वक्तव्य चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात केले होते आणि त्यानंतर पुढील घटनाक्रम घडण्यास सुरुवात झाली.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x