14 July 2020 7:08 PM
अँप डाउनलोड

शहांशी चर्चा झाली ती बंद खोली बाळासाहेबांची; आमच्यासाठी ते मंदिर: संजय राऊत

MP Sanjay Raut, Amit Shah, PN Narendra Modi, BJP, Shivsena

मुंबई: शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचं ठरलंच नव्हतं असा दावा करणारे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना शिवसेनेनं आज चोख प्रत्युत्तर दिलं. ‘शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असं शिवसेनेचे पक्षप्रमुख प्रत्येक सभेत सांगत असताना अमित शहा गप्प का होते. त्यांनी त्यावेळी आक्षेप का घेतला नाही,’ असा सवाल करतानाच, ‘अमित शहा यांनी युतीच्या सत्तावाटपाची चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून लपवली,’ असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज केला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राऊत यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकीआधी अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान मातोश्रीवर झालेल्या चर्चेबद्दल भाष्य केलं. केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे वक्तव्य नैतिकतेला धरुन नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. बंद दाराआड जी चर्चा झाली ती पंतप्रधानांपर्यंत नेली असती तर इतकी वेळ आली नसती. ही बंद खोली सामान्य खोली नव्हती. ज्या खोलीत बाळासाहेबांनी शिवसैनिकांना आशिर्वाद दिला. पंतप्रधान मोदींनी इथे आशिर्वाद घेतला. इथे अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. आमच्यासाठी हे मंदीर आहे. या मंदीरात ही चर्चा झाली. संपूर्ण देशाची श्रद्धा या मंदीराशी जोडली गेली आहे. बाळासाहेबांची शपथ घेऊन आम्ही कधी खोट बोलणार नाही. आम्ही खोट्याचे राजकारण करणार नाही.

“शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिले जाईल असे कोणतेही आश्वासन भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या युतीच्या चर्चेत केलेले नव्हते. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी अनेकदा जाहीरपणे सांगितले होते की, युतीचा विजय झाला तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. त्यावर कोणीही (शिवसेनेने) एकदाही आक्षेप घेतला नाही. आता मात्र कोणी नवीन अटी घालत असेल तर ते भारतीय जनता पक्ष कसे मान्य करेल?”, असा सवाल उपस्थित करत शहा यांनी उद्धव ठाकरे यांचे आरोप फेटाळले होते.

आता बंद खोलीमधील चर्चा बाहेर कशा आल्या अशी विचारणा भारतीय जनता पक्षावाले करत आहेत. मात्र बंद खोलीतल्या चर्चा बाहेर का आल्या. तुम्ही ती चर्चा आणि ठरलेली गोष्ट मान्य केली असती तर बंद खोलीत झालेली चर्चा बाहेर आली नसती. बंद दाराआड झालेल्या चर्चेचा विषय हा दिल्या घेतल्या शब्दाचा आणि वचनाचा होता. महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा होता. स्वाभिमानाचा होता, असेही संजय राऊत म्हणाले.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(105)#Shivsena(892)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x