17 May 2021 7:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर
x

आधुनिक अफजल खानानी मराठी आणि हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला: संदीप देशपांडे

MNS Leader Sandeep Deshpande, HIndutva

मुंबई: राज ठाकरे यांनी शिवसेनेशी फारकत घेऊन मनसेची स्थापना केल्यापासून राज ठाकरे आणि मनसेला सामाना वृत्तपत्रात स्थानच नव्हतं. अगदीच राज ठाकरेंच्या मनसेची एखादी बातमी आलीच तरी त्या बातमीला एखादा कोपराच मिळत असे. मात्र ज्यावर आजपर्यंत राजकारण केलं तो हिंदुत्वाचा मुद्दा आणि महाविकास आघाडीत सरकारमध्ये झालेली हिंदुत्वाच्या मुद्द्याची कोंडी यामुळे शिवसेना पेचात अडकली आहे. त्यामुळे बदलत्या राजकीय समीकरणामुळे कोंडी झाली असताना राज ठाकरे यांनी हिंदुत्वाला हात घालताच शिवसेनेच्या जळफळाटाने मनसे आणि राज ठाकरे यांना थाट सामनाच्या अग्रलेखात स्थान दिल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून शिवसेनेची या मुद्यावरून किती कोंडी झाली आहे याचा प्रत्यय येऊ लागला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यानंतर आता मनसे नेते आणि संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे. ‘आधुनिक अफजल खानानी मराठी आणि हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. नेमकं त्याच गोष्टीवर राजसाहेबांनी बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर पडत्यात. काळजी करू नका आम्हीच उपचार करू,’ अशी विखारी टीका संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर केली आहे. त्यामुळे आगामी काळातही शिवसेना आणि मनसे आमने-सामने येणार असल्याचं दिसत आहे.

वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्यांचा खेळ नाही. तरीही या देशात कुणी हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी नवी घडी बसवत असेल तर त्यांचे स्वागत करण्याची दिलदारी आमच्याकडे आहेच. विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्वाचाच आहे. झेपेल तर पुढे जा असं म्हणत शिवसेनेनं मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

दोन झेंड्यांची योजना करणे हे गोंधळलेल्या मनःस्थितीचे किंवा घसरलेल्या गाडीचे लक्षण आहे असं म्हणत सामनातून मनसेवर जोरदार टीका करण्यात आली आहे. गेल्या १४ वर्षांत राज ठाकरे यांना ‘मराठी’ प्रश्नावर काही भव्य काम करता आले नाही आणि आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाग्य आजमवता येईल काय? याबाबत शंकाच जास्त आहेत. ‘मनसे’प्रमुखांना त्यांचे मुद्दे मांडण्याचा आणि पुढे रेटण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्यांनी आज घेतलेल्या भूमिका व त्याच विषयावर १५ दिवसांपूर्वी मांडलेली मते मेळ खात नाहीत, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

राज यांनी घेतलेली भूमिका कशी शिवसेनाद्वेषातून आली आहे, हेही अग्रलेखात सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाची शिवसेनाद्वेषाची मूळव्याध दुसऱ्या मार्गातून बाहेर येत आहे आणि हे त्यांचे खेळ जुनेच आहेत, असा टोला राज ठाकरे यांना लगावण्यात आला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले आमचा अंतरंग भगवाच आहे आणि आजच्या घटनेने शिवसेना मोठ्या राजकीय पेचात सापडण्याची शक्यता आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीवरुन सुरु असलेल्या वादावर मुंबईतील २०० मुस्लिम नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी भेट घेतली होती. या बैठकीचं नैतृत्व अझरात सय्यद मोईनुद्दीन अशरफ मोईन मिया आणि रझा अकादमीचे संस्थापक अल्हाज सईद नूरी यांनी केलं होतं. पोलीस आयुक्तालयात ही भेट झाली. त्यात मुंबई आझाद मैदानातील दंगलीच्या प्रकरणातील विवादित रझा अकादमीचे मुस्लिम नेते देखील हजर होते. यावेळी या नेत्यांनी सीएए आणि एनआरसी विरोधात मुख्यमंत्र्यांकडे निषेध व्यक्त केला. ज्याप्रकारे पंजाब आणि केरळ सरकारने सीएएविरोधात कायदा पारित केला तशाप्रकारे महाराष्ट्रातही हा कायदा लागू करु नका अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यावेळी कोणालाही हा देश सोडून जाण्याची गरज नाही असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांना दिलं.

 

Web Title:  MNS Leader Sandeep Deshpande criticized Shivsena over Hindutva issue.

हॅशटॅग्स

#SandeepDeshpande(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x