15 December 2024 1:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

राज ठाकरे पुन्हा चांगल्या प्रकारे काम करतील: अमृता फडणवीस

Amruta Fadnavis, Shivsena, MNS

पुणे: “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षासाठी आता नवीन दिशा ठरवली आहे. ते पुन्हा चांगल्या प्रकारे काम करतील,” अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मांडली. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमापूर्वी त्यांना अनेक विषयांवर भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना राज ठाकरे चांगलं काम करतील असं त्या म्हणाल्या.

तसेच माझ्या सारख्या शिवसैनिकाला खरा नेता पाहण्याची गरज असते. त्यांना फॉलो करण्याची गरज असते, त्यामुळे आता आपल्याला खऱ्या नेत्याची खूप गरज आहे. असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. तर फोन टॅप प्रकरणावर म्हणाल्या की, या तिघा पक्षांना भारतीय जनता पक्ष नको आहे, त्यामुळे ते भारतीय जनता पक्षावर खोटे आरोप करत आहेत. आणि आधीच्या सरकारमध्ये शिवसेना देखील होती त्यामुळे याची चौकशी झाली तरी चालेल. एकंदरीत सगळ्याच विषयावर अमृता यांनी बेधडक उत्तरे दिली आहेत.

मुंबईतील नाईट लाईफबद्दल त्या म्हणाल्या की, “नाईट लाईफबद्दल अजून काही विचार केलेला नाही. मात्र यात सुरक्षेचा प्रश्न कसा हाताळला जाईल हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे.” “महिला दिवस-रात्र येथे काम करतात. महिलांसाठी मुंबई सुरक्षित आहे. त्यामुळे मुंबईचा मला अभिमान वाटतो. मुबंईसारखे अनुकरण दुसऱ्या शहरांनीदेखील करावं,” असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार यांची सुरक्षा काढून घेतल्याबाबत अफवा पसरवली जात असावी आणि यामध्ये काही तथ्यही नसेल असं वाटत आहे, असं त्या म्हणाल्या. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्यांवर भाष्य केले.

 

Web Title:  Amruta Fadnavis talked about Shivsena and MNS at Pune.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x