3 May 2024 2:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट
x

शर्मिला राज ठाकरे यांच्याकडून पोलिसांना पीपीई किट वाटप; पोलिसांची सुरक्षा महत्वाची

Sharmila Raj Thackeray, PPE Kit, Savitri Pratishthan, Corona Crisis

मुंबई, १२ एप्रिल: राज्यातील करोनाचं संकट काही कमी होताना दिसत नाही. राज्यात गेल्या २४ तासांत १८७ नवे करोना रुग्ण सापडल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १८९५वर गेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरी आव्हान आणखी वाढले आहे.

एकीकडे कोरोनाचे संकट गहिरे होत असताना दुसरीकडे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार लांबले आहेत. पगार काढणाºया यंत्रणेतील अधिकारीच कामावर नसल्याने अनेक अडचणी आहेत. मार्च पेड इनटू एप्रिलचा पगार अधिकाऱ्यांना ५० टक्के तर कर्मचाºयांना ७५ टक्केच मिळणार आहे. कोरोनाचा मुकाबला करणारे पोलीस दल, आरोग्य सेवेतील कर्मचारीही दोन टप्प्यांच्या सरकारी कचाट्यातून सुटू शकलेले नाहीत. त्यातच आता पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनची भर पडली आहे.

मात्र आर्थिक चणचण आणि त्यात जीव देखील धोक्यात टाकावा लागत असल्याने पोलिसांची देखील चिंता वाढली आहे. राज्यात लॉकडाउनच्या काळात सुरक्षा व्यवस्थेचं काम करणाऱ्या पोलिसांच्या जिवाला करोनामुळे धोका निर्माण झाला आहे. अनेक पोलिसांनाही करोनाचा संसर्ग झाल्याचंही समोर आलं. पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मनसेनं पुढाकार घेतला आहे. शर्मिला राज ठाकरे आणि रिटा गुप्ता यांच्या सावित्री प्रतिष्ठानच्या वतीनं मुंबईतील करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या भागातील पोलिसांना पीपीई किटचं वाटप करण्यात आलं.

 

News English Summary: Police have also raised concerns as the financial crisis and their lives are at stake. During the lockdown in the state, the security of police personnel working in the state has risen due to coronation. Many policemen also reported having coronary infection. MNS has taken initiative to take care of the health of the police. Sharmila Raj Thackeray and Rita Gupta, on behalf of the Savitri Pratishthan, were allotted a PPE kit to the police in the affected areas of Corona in Mumbai.

News English Title: Story Sharmila Raj Thackeray on behalf of the Savitri Pratishthan allotted a PPE kit to police during corona crisis in Mumbai Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x