26 November 2022 10:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Weekly Horoscope | 28 नोव्हेंबर - 4 डिसेंबर | 12 राशीच्या लोकांसाठी कसा राहील आगामी आठवडा, नशीबाची साथ कोणाला? Tata Mutual Fund | टाटा म्युच्युअल फंडमधील टॉप 10 स्किमची लिस्ट सेव्ह करा, 3 वर्षात पैसे दुप्पट करा आणि मालामाल व्हा Horoscope Today | 27 नोव्हेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 27 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Bhediya Box Office Collection | बॉक्स ऑफिसवर 'भेडिया'ची दमदार ओपनिंग, 1 दिवसात किती कोटींचा गल्ला? Paytm Share Price | खरं की काय? पेटीएमचा स्टॉक पुन्हा दुपटीने वाढणार? तज्ज्ञ असं सांगत असण्यामागे नेमकं कारण काय? Vikram Gokhale | मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसंच नाट्यसृष्टीतही अढळपद निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच निधन
x

मनसेने राजकारणासाठी शॅडो कॅबिनेट केली असेल तर आम्ही...शिवसेनेची प्रतिक्रिया

MNS Shadow Cabinet, Shivsena

मुंबई: राज्य सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेने महाअधिवेशनात शॅडो कॅबिनेट स्थापणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार मनसेने शॅडो कॅबिनेटची स्थापना केली असून त्यात राज ठाकरेंनी विशिष्ट स्थरातील पदाधिकाऱ्यांना स्थान दिलं आहे. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान शॅडो कॅबिनेटमधील प्रत्येक नेत्यावर संबंधित खात्याच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच शॅडो कॅबिनेटमधील हे नेते एखाद्या मंत्र्याने गैरव्यवहार केला, तर त्याचा पाठपुरावा करणार आहेत.

महाराष्ट्रातील विविध समाजगटासाठीसाठी एक वेगळा प्रयोग म्हणून मनसेने प्रतिरुप मंत्रिमंडळाची (शॅडो कॅबिनेट) स्थापना करण्यात आली आहे. सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी हे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले आहे. सरकारचे वाभाडे काढण्यासाठी हे शॅडो कॅबिनेट आहे. पण प्रत्येकवेळी वाभाडेच काढले पाहिजेत असे नाही. तर त्यांनी चांगले काम केले तर त्यांचे कौतुकही करायचे, असे वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले.

मनसेच्या या निर्णयावर शिवसेनेने पहिली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. मनसेनं विधायक सूचना करण्यसाठी जर हे केलं असेल तर त्यांच्या सूचनांचा आम्ही विचार करू. मात्र राजकारणासाठी हे काम असेल तर मात्र आम्ही त्याला महत्त्व देणार नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे मंत्री आणि नेत अनिल परब यांनी व्यक्त केली.राज्याच्या विकासासाठी जे कुणी विधायक सूचना करतील त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही त्याचा विचार करू आणि त्या घेता येतील का ते पाहू मात्र विरोधासाठी विरोधाला किंमत देत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

News English Summery: The 14th anniversary of the Maharashtra Navnirman Sena was celebrated in Navi Mumbai. An important announcement was made at the event regarding the Shadow Cabinet. Representative ministries were established to control the functioning of the state government. This responsibility has been entrusted to the leaders and office bearers. Raj Thackeray had announced that this cabinet would work to protect the government, not to oppose the opposition, but to give constructive suggestions for constructive suggestions. Shiv Sena has reacted first to this decision of MNS. If MNS has done this to make constructive suggestions, then we will consider their suggestions. However, if this is a work for politics, then we will not give importance to it, Shiv Sena Minister and Leader Anil Parab said. We will consider it and see if they can be taken, but they do not pay the price for the conflict.

 

Web New Title: Story Shivsena first reaction after MNS Shadow cabinet formation.

हॅशटॅग्स

#Shivsena(1169)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x