वाधवान बंधूंना सीबीआयच्या ताब्यात देणार - गृहमंत्र्यांची माहिती
मुंबई, २२ एप्रिल: “वाधवान कुटंबीयांच्या क्वारंटाइनची वेळ आज दुपारी दोन वाजता संपत आहे. त्यामुळे आपल्या पोलीस खात्यातर्फे सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि सीबीआय यांना पत्र लिहून त्यांना आपल्या ताब्यात घ्यावं असं कळवलं आहे. सीबीआय वाधवान कुटुंबीयांना घेऊन जात नाही तोपर्यत वाधवान कुटुंब आमच्या ताब्यात राहणार आहे. सीबीआयने आमच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडे सोपवू,” अशी माहिती अनिल देशमुख यांनी यावेळी दिली.
लॉकडाऊनच्या काळात मुंबईहून महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या वाधवान कुटुंबियांना ७ एप्रिलला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. राज्याचे गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांनी त्यांना लॉकडाऊनमध्ये प्रवास करण्याची परवानगी देणारे पत्र दिले होते. याच पत्रामुळे त्यांनी मुंबई ते सातारा असा प्रवास केला होता. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यावर अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, पालघरमध्ये चोरीच्या संशयावरुन दोन साधू आणि त्यांच्या गाडी चालकाची जमावाने निर्घृणपणे हत्या केली होती. या घटनेप्रकरणी आतापर्यंत १०१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यापैंकी एकही जण मुस्लिम नाही, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. गृहमंत्र्यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी हे सांगतिले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ट्विटर लाइव्हवरून जनतेशी संवाद साधत पालघर आणि वाधवान प्रकरणावर भाष्य केलं.
News English Summary: “The quarantine time of Wadhwan family ends at 2 pm today. Therefore, your police department has written a letter to the Directorate of Recovery (ED) and CBI asking them to arrest you. Unless the CBI takes away the Wadhwan family, the Wadhwan family will remain in our custody. We will hand it over to them after the CBI contacts us, ”said Anil Deshmukh.
News English Title: Story wont let DHFL Scam accused Wadhawans flee country like other defaulters says Maharashtra Home Minister Anil Deshmukh News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा