12 December 2024 10:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
x

प्लास्टिक कचरा येतो, पण समुद्रकिनारी डंपरने 'डंप' केल्यासारखा चिखल आलाच कुठून?

Mumbai Beach, Aaditya Thackeray, Uddhav Thackeray, BMC, Social Work

मुंबई : एका बाजूला दादर-माहीम चौपाटीवरचा रोजचा कचरा उचलण्यासाठी प्रशासनाला २०१८ मध्येच लघुनिविदा काढण्याची वेळ आली होती. समुद्रात टाकलेला कचरा भरतीच्या लाटांमधून पुन्हा किनारपट्टीवर येत असल्याने किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेला वर्षभरात कोटय़वधी रुपये खर्च करावे लागतात. माहीम-दादरचा पाच किलोमीटरचा किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी सर्वात कमी बोली लावणाऱया मे. विशाल प्रोटेक्शन फोर्स यांना पुढील सहा वर्षांसाठी तब्बल १२ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात येणार होते. या कंत्राटानुसार किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी पावसाळय़ात दर दिवसाला ६५ हजार रुपये तर पावसाळय़ानंतरच्या दिवसांत दरदिवशी ३५ हजार रुपये देण्यात येणार होते. दरवर्षी त्यात पाच टक्क्यांनी वाढ करण्यात येणार होती.

दरम्यान, मुंबईच्या समुद्रकिनारी साधारणपणे प्लास्टिक, निर्माल्य, कागदी किंवा प्लास्टिक पिशव्या आणि बॉटल्स तसेच बांधकामासाठी लागणाऱ्या नायलॉनच्या गोण्या अशा प्रकारचा कचरा पाहायला मिळतो आणि तो रेतीत मिसळलेला असतो. मात्र चिकट मातीचे गोळे असलेला चिखल हा समुद्र किनारी गठ्याने साचलेला आढळत नाही. आज मुंबईच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरु आहेत आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या खोदकामातुन मोठ्या प्रमाणावर माती म्हणजे पावसाळ्यात ‘चिखल’ काढला जातो. मात्र तो अनेकदा नियमांची पायमल्ली करून भ्रष्ट मार्गाने भलत्याच ठिकाणी टाकला जातो आहे. तसाच काहीसा प्रकार सध्या समाज माध्यमांवर आदित्य ठाकरे यांच्या स्वच्छता अभियानाचे जोरदार प्रोमोशन सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

दरम्यान, आदित्य ठाकरे वर्सोवा येथे स्वच्छता करत असलेली रेती नसून तो मुंबईमध्ये बांधकाम करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खोदकामातून निघणारा चिखल दिसत आहे. त्यात आदित्य ठाकरे हे गमबूट घालून माखलेले दिसत आहेत आणि बाजूला त्यांची सेक्युटिरी देखील दिसत असून, आदित्य यांचे विविध पोजमधले फोटो समाज माध्यमांवर वायरल केले जात आहेत. विशेष म्हणजे प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यावर सध्या आदित्य ठाकरे यांच्यावर पक्ष काम करत असल्याने त्यात मुंबईला केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे. त्यामध्ये इतर नियोजन देखील करण्यात येते आहे, म्हणजे कालच आदित्य ठाकरे यांचे मित्र अक्षय कुमार आणि दिनो मोरया यांनी देखील ट्विट करून मुंबई महापालिका आता ट्विटरवर तक्रार निवारण करत असल्याची आठवण मुंबईकरांना दिली होती. आता ७०-८० कोटीच्या घरात राहणाऱ्या आणि अनेक सुसज्य सोयीसुविधांनी परिपूर्ण आयुष्य जगत असताना अभिनेता अक्षय कुमार आणि दिनो मोरया एकदम मुंबई महानगपालिकेच्या कोणत्या सुविधेचा लाभ उचलायला गेले तेव्हा त्यांना ही बाब लक्षात आली ते समजण्यापलीकडचं आहे. त्यामुळे अनेकांनी हा केवळ स्वतःच्या प्रमोशनसाठी केलेला स्टंट असल्याचं म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या समाजसेवेचे फोटो समाज माध्यमांवर प्रसारित करून शिवसैनिक त्यांची प्रशंसा करत असले तरी, इतर पक्षातील नेते जेव्हा ते करतात, तेव्हा त्यांना राजकीय स्टंट संबोधणारे देखील हेच शिवसैनिक असतात असा अनुभव यापूर्वी अनेकदा आला आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x