20 April 2024 12:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

मुंबई: आईसह ३ दिवसांच्या नवजात बाळाला कोरोनाची लागण

Corona Crisis, Covid 19, Mumbai Baby Boy Covid 19 Positive

मुंबई, २ एप्रिल: मुंबईत तीन दिवसांच्या बाळाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. बाळाची आई आणि बाळ या दोघांचे सोमवारी चाचणीचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. महिलेला प्रसतुकळा सुरु झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयातील कोरोना विषाणू बाधितांच्या संपर्कात आल्यानं महिलेला विषाणूची बाधा झाल्याचं समोर आलं आहे, या रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल देखील पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या पीडित व्यक्तीची कोरोनाबाधित पत्नी व बाळ कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, पीडित व्यक्ती क्वारंटाइन वॉर्डमध्ये आहे. ‘कस्तुरबामध्ये माझ्या पत्नीला व मुलाला चांगले उपचार मिळत आहेत. मात्र, माझ्या बाळाची अधिक काळजी घ्यावी,’ असं आवाहन पीडित व्यक्तीनं केलं आहे.

बाळाच्या आईला २६ मार्च रोजी प्रसुतीसाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर ३० मार्च रोजी तिचे स्त्राव नमुने घेण्यात आले. ३१ मार्चला महिलेला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं. आता महिला आणि तिच्या बाळाला पुढील उपचारांसाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

News English Summary: A three-day-old baby has been infected with Corona virus in Mumbai. Reports of a Monday trial for both the baby’s mother and baby have come in positive. The woman was rushed to the hospital due to the onset of adversity. The test reports of some staff at the hospital have also come positive for the woman who has been exposed to the virus after being exposed to corona virus disorders in this hospital. The victim’s wife and baby are currently undergoing treatment at Kasturba Hospital. So, the victim is in the quarantine ward. ‘My wife and son are getting good treatment in Kasturba. However, the victim appealed, “Take care of my baby more.”

 

News English Title: Story Mumbai 3 day old boy is Citys youngest corona patient Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x