15 July 2020 11:17 PM
अँप डाउनलोड

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे यांचा आज ७वा स्मृतिदिन

Shivsena, Balasaheb Thackeray

मुंबई: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज ७वा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांच्या विचारांतून मराठी माणसाला कायम स्फूर्ती मिळत राहते. स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांच्या अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

शरद पवार यांच्याबरोबरच भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. “हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन,” असं ट्विट गडकरी यांनी केलं आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील बाळासाहेबांना अभिवादन करणार ट्विट केलं आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली आहे. फडणवीस यांनी ट्विटरवरून बाळासाहेबांविषयी मनोगत व्यक्त करणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

शिवसेनेचे राज्यभरातील पदाधिकारी, आमदार, खासदार पुण्यतिथीनिमित्त स्मृतिस्थळाला भेट देत असतात व ते नेहमीप्रमाणे या ठिकाणी मोठ्या संख्येने जमणार असल्याने त्यांची योग्य ती व्यवस्था व्हावी व गर्दीचे नियोजन व्यवस्थित व्हावे, यासाठी शिवसेनेने मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवकांची फौज तिथे तैनात ठेवल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Shivsena(892)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x