3 May 2025 11:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

अफवांवर विश्वास ठेऊ नका, मुंबईला टोळधाडीचा धोका नाही - एलडब्लूओ

Union ministry of agriculture, locusts attack, Mumbai

मुंबई, २८ मे: कोरोना, अफ्मान चक्रीवादळा पाठोपाठ आता टोळ कीटकाचा धोका देशातील नागरिकांपुढे उभा ठाकला आहे. तर टोळधाडीचं संकट आता मुंबईत देखील आलं असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनेक फोटो आणि व्हिडिओमुळे मुंबईत टोळ दिसून आल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत असलेल्या द लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशनने (एलडब्लूओ) मुंबईला टोळधाडीचा धोका नसल्याचं म्हटलं आहे.

“भंडारा जिल्ह्यात तुमसर येथे बुधवारी रात्री टोळधाड होती. तेथून गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास नदी ओलांडून तिने मध्यप्रदेशात प्रवेश केला आहे. मुंबईला टोळधाडसंदर्भात कोणताही इशारा दिलेला नाही. सध्या फिरत असलेली माहिती या अफवा आहेत.” अशी माहिती दिवस यांनी दिली. कृषी खात्यातील कर्मचारी याबाबत दक्ष असून टोळधाडीच्या मागावर असल्याचे त्यांनी नमूद केलं आहे.

“मुंबईच्या दमट हवामानामध्ये टोळ जगू शकतात. असं असलं तरी मुंबईवर टोळधाड पडण्याची शक्यता कमी आहे. गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यांवरुन वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे टोळ मुंबईत प्रवेश करण्याची शक्यता नाहीय,” असं एएलओचे उपसंचालक के. एल. गुजजार यांनी म्हटलं आहे. एएलओचे टोळधाडींसंदर्भातील हलचालींवर लक्ष असून मुंबई तसेच कोकणपट्ट्यामध्ये टोळधाडीसंदर्भातील इशारा देण्यात आलेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गेले काही दिवस मध्यप्रदेश, राजस्थान सारख्या राज्यांत या कीटकांची झुंड पाहायला मिळत आहे. तर महाराष्ट्रातील काही भागात टोळधाड दाखल झाली असून मुंबईत देखील त्याचा शिरकाव झाला असल्याची चर्चा सुरू आहे. लेखिका शोभा डे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून मुंबईत टोळ आल्याचा दावा केला आहे. तर असे अनेक व्हिडिओ समोर आले असून ते मुंबईतील असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटातच टोळधाडीच्या चिंतेने मुंबईकरांमध्ये भीतीचं वातारण पसरलं आहे.

गुरुवारी मुंबईमधील अनेकांनी सरकारी यंत्रणांना फोन करुन मुंबईत टोळ दाखल झाले आहेत का यासंदर्भात चौकशी केल्याचे ‘मीड डे’ने आपल्या वृत्तामध्ये म्हटलंय. तर ‘मुंबई मिरर’ने प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्या ट्विटरच्या हवाल्याने मुंबईमध्ये टोळ दिसत असल्याचे वृत्त दिलं.

 

News English Summary: Following the Corona, Hurricane Afman, the threat of locusts is now facing the citizens of the country. There is talk that the locust crisis has now hit Mumbai as well. Many photos and videos circulating on social media have sparked rumors that locusts have appeared in Mumbai. However, The Locust Warning Organization (LWO) under the Union Ministry of Agriculture has said that Mumbai is not at risk of locusts.

News English Title: Union ministry of agriculture has revealed about locusts attack in Mumbai News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या