15 December 2024 6:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या
x

वेळ निघून गेली आहे, तेव्हा त्या हाताला प्रेमानं थोपटण्याऐवजी झिडकारण्याचा प्रयत्न झाला - सुभाष देसाई

MahaVikas Aghadi, Industrial Minister Subhash Desai, BJP

मुंबई, ३१ जुलै : आपल्याला कोरोनासोबत जगावं लागेल. कोरोनाचं एका बाजूला व्यवस्थापन करावं लागणार आहे तर दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात बोलत होते. सगळ्या बाजारपेठा खुल्या करा अशी मागणी व्यापारी करत आहेत, त्यांची ही मागणी चुकीची नाही. कोरोनाचं संकट गंभीर मात्र उद्योग सुरु करावे लागतील, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.

यावेळी सुभाष देसाई म्हणाले की, उद्योग विभागानं उद्योगांना चालना देण्यासाठी चांगल्या सुविधा द्यायला सुरु केल्या आहेत. एमआयडीसीने उद्योजकांना तयार शेड देण्याची तयारी केली आहे. नवीन गुंतवणूकदारांना उद्योगमित्र उपलब्ध करुन देणार आहोत. महापरवाना ही योजना सुरु केली आहे. ४८ तासात उद्योगासाठी परवानगी देण्यात येईल, म्हणजे तात्काळ त्यांना उत्पादन घेता येऊ शकेल. महाजॉब्स ही देखील चांगला उपक्रम आपण सुरु केला आहे. याला युवकांचा प्रतिसाद करतोय.

दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी करण्यात येणाऱ्या औद्योगिक उपाययोजनांची माहिती सुभाष देसाई यांनी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात दिली. यावेळी देसाई यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना देसाई म्हणाले, “नाही. ती वेळ आता निघून गेली. जेव्हा हात पकडलेलाच होता, तेव्हा त्या हाताला प्रेमानं थोपटण्याऐवजी त्या हाताला झिडकारण्याचा प्रयत्न झाला. त्रास देण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा ती वेळ गेलेली आहे. आता नको. आता त्याऐवजी आम्ही तीनजण एकत्र येऊन, परस्परांवर विश्वास ठेवून तीन पक्षांचं सरकार चांगलं काम करतंय आणि पुढची दिशा ठरलेली आहे. त्यामुळे त्याच दिशेनं आम्ही पुढं जाणार. जुन्या मित्रांना त्यांचा जो काही मार्ग असेल… त्यांनी ते कबूल केलेलं आहे की, आम्ही आता एकटे लढणार. माझ्या शुभेच्छा आहेत, त्यांना. अर्थात त्यांच्या बरोबरचे काही पक्ष जवळ आलेले होते. आठवले, जानकर, सदाभाऊ खोत याचं काय होणार माहिती नाही. कारण भाजपा एकटं लढणार आहे. आम्ही तिघे एकत्र आहोत आणि एकत्र राहणार,” असं देसाई म्हणाले.

 

News English Summary: Desai was asked about the statement made by BJP state president Chandrakant Patil. Replying to him, Desai said, no. That time is now gone. When he was holding the hand, instead of patting it lovingly, he tried to shake it.

News English Title: We Will Not Alliance With BJP said Industrial Minister Subhash Desai News latest Updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)#SubhashDesai(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x