Best Mutual Funds | टॉप 5 म्युचुअल फंड योजना, 5 वर्षात छप्परफाड परतावा, तुम्ही सुद्धा मिळवु शकता घसघशीत परतावा

Best Mutual fund | जर तुम्ही देखील म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 म्युच्युअल फंडांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून घसघशीत नफा मिळवू शकता. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. म्युचुअल फंड चे वर्गीकरण लार्ज-कॅप म्युच्युअल फंड, मिड-कॅप फंड, स्मॉल-कॅप फंड, फ्लेक्सी-कॅप फंड आणि ELSS मध्ये वर्गीकृत केले जातात. या पाच म्युचुअल फंडानी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील 5 वर्षांत यांनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळवून दिला आहे.
टॉप 5 म्युचुअल फंड खालीलप्रमाणे :
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड :
ह्या म्युचुअल फंडची 2013 साली झाली होती. ह्या फंडाच्या माध्यमातून स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. जर तुम्ही जोखीम घेण्यास सक्षम असाल तर गुंतवणूक करायला तुमच्यासाठी हा सर्वोत्तम म्युच्युअल फंड आहे. या म्युचुअल फंडाने मागील 5 वर्षात तब्बल 23.61 टक्के परतावा दिला आहे.
अॅक्सिस मिड-कॅप फंड :
अॅक्सिस मिड-कॅप फंडाची सध्या एकूण मालमत्ता मूल्य 13834.27 कोटी रुपये आहे. ज्यांना फक्त 3 ते 4 वर्षे या छोट्या कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे आणि उच्च परतावा मिळवायचा आहे त्यांच्यासाठी हा म्युचुअल फंड एक नंबर आहे. या म्युचुअल फंडाचा मागील 5 वर्षांचा परतावा दर 21.13 टक्के आहे.
पीजीआयएम इंडिया मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंड :
या म्युचुअल फंडात किमान 1000 रुपयांच्या SIP पासून गुंतवणूक करता येते. या फंडाची सध्या एकूण मालमत्ता मूल्य 2383.38 कोटी रुपये आहे. तर किमान एकरकमी गुंतवणूक मर्यादा 5000 रुपये आहे. पीजीआयएम इंडिया मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंडाने मागील 5 वर्षांत SIP वर 21.23 टक्के परतावा दिला आहे.
कॅनरा रोबेको ब्लूचिप लार्ज-कॅप इक्विटी फंड :
कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाने सुरू केलेली कॅनरा रोबेको ब्लूचिप लार्ज-कॅप इक्विटी फंड योजना 2013 साली सुरू करण्यात आली होती. या म्युचुअल फंड ची मालमत्ता अंडर मॅनेजमेंट (AUM) 3,691.25 कोटी रुपये असून हा म्युचुअल फंड अत्यंत उच्च जोखीमचा फंड म्हणून ओळखला जातो. यात तुम्ही फक्त 1000 रुपयांच्या SIP सह गुंतवणूक सुरू करू शकता. मागील 5 वर्षात या म्युचुअल फंड योजनेने SIP वर 18.08 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.
अॅक्सिस लार्ज-कॅप ब्लूचिप फंड :
अॅक्सिस म्युच्युअल फंडाने लाँच केलेल्या अॅक्सिस लार्ज कॅप ब्लूचिप फंडाची सध्या मालमत्ता अंडर मॅनेजमेंट 29160.6 कोटी रुपये आहे. ह्या म्युचुअल फंड च्या माध्यमातून ब्लू-चिप स्टॉक्स किंवा मोठ्या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली जाते जे आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि प्रस्थापित आहेत. जेव्हा ते मिड-कॅप किंवा स्मॉल-कॅप शेअर्सपेक्षा कमी अस्थिर असतात तेव्हा त्यात गुंतवणूक करण्याची योग्य वेळ असते. या म्युच्युअल फंडाने मागील 5 वर्षांत 18.50 टाकले चक्रवाढ पद्धतीने वार्षिक दर वाढ प्रमाणे परतावा दिला आहे. या म्युचुअल फंडात तुम्ही किमान 1000 रुपये पासून SIP सुरू करू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Best Mutual Funds investment returns for long term on 20 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN