
HDFC Mutual Fund | एचडीएफसी म्युच्युअल फंडाची इक्विटी योजना ‘एचडीएफसी फार्मा हेल्थकेअर फंड’ने १ वर्षात एसआयपी आणि एकरकमी अशा दोन्हीवर ५० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. एचडीएफसी फार्मा अँड हेल्थकेअर फंड ही ओपन एंडेड इक्विटी स्कीम आहे, जी फार्मा आणि हेल्थकेअर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते.
सेक्टोरल फंडाने केवळ आपल्या श्रेणीच्या सरासरीलाच मागे टाकले नाही तर बीएसई हेल्थकेअर टोटल रिटर्न इंडेक्स या बेंचमार्कलाही मागे टाकले आहे. चला जाणून घेऊया या फंडाची संपूर्ण माहिती आणि त्याच्या पोर्टफोलिओची खासियत.
एसआयपी आणि एकरकमी गुंतवणुकीवर मजबूत परतावा मिळतोय
एचडीएफसी फार्मा अँड हेल्थकेअर फंड सुरू होऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. त्याचबरोबर या योजनेने चांगला परतावा दिला आहे. जर एखाद्याने 1 वर्षापूर्वी या योजनेत एकरकमी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे सध्याचे फंड मूल्य सुमारे 1.54 लाख रुपये झाले असते.
एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या वेबसाइटनुसार, या योजनेचा 1 वर्षाचा वार्षिक परतावा 53.62% आहे. जर कोणी ही योजना सुरू करताना म्हणजेच 4 ऑक्टोबर 2023 रोजी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे सध्याचे फंड मूल्य 1.67 लाख रुपये आणि वार्षिक परतावा 55.85% झाला असता. दुसरीकडे, जर एखाद्याने या योजनेत गेल्या 1 वर्षात दरमहा 10,000 रुपयांची मासिक एसआयपी केली असेल तर त्याचे सध्याचे फंड मूल्य सुमारे 1.52 लाख रुपये असेल. तर या काळात त्यांची एकूण गुंतवणूक 1.20 लाख रुपये असेल.
एकरकमी 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर पैसा कसा वाढतोय
* 1 वर्षात: 1,53,619.10 रुपये
* योजना सुरू झाल्यापासून : 1,67,030 रुपये
* 1 वर्ष परतावा: 53.62% (वार्षिक)
* लाँचिंगपासून परतावा: 55.85% (वार्षिक)
महिना एसआयपी गुंतवणुकीवर पैसा कसा वाढतोय
* मासिक एसआयपी : 10,000 रुपये
* 1 वर्षात एकूण गुंतवणूक : 1.20 लाख रुपये
* 1 वर्षातील एसआयपी गुंतवणुकीचे मूल्य : 1,51,89.41 रुपये
* एसआयपीवर 1 वर्षाचा परतावा: 52.29% (वार्षिक)
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.