30 May 2023 12:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Symphony Share Price | कुलर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 3,00,000 टक्के परतावा दिला, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे झाले 30 कोटी, स्टॉक डिटेल्स Money Saving Tips | पैसे हाताशी थांबत नाहीत का? फॉलो करा या 8 टिप्स आणि आयुष्यातील आर्थिक बदल पहा शिंदे गट धोक्यात! आज निवडणूक झाल्यास शिंदे यांच्या शिवसेना गटाला केवळ 5.5% मते मिळतील, मनसे सर्वेतही शिक्कल नाही - सर्वेक्षण रिपोर्ट Adani Enterprises Share Price | 1 महिन्यात अदानी एंटरप्रायझेस शेअरने 32% परतावा दिला, अदानी स्टॉक तेजीत, ब्लॉकडीलची जादू काय आहे? Axita Cotton Share Price | सुवर्ण संधी! एक्झीटा कॉटन कंपनी 28 रुपयाचा शेअर 56 रुपयांना बायबॅक करणार, रेकॉर्ड डेटच्या आधी फायदा घ्या Bajaj Steel Industries Share Price | बजाज स्टील इंडस्ट्रीज शेअरने गुंतवणूकदारांना 1500 टक्के परतावा दिला, आता 60 टक्के लाभांश देणार Personal Loan | पर्सनल लोन घेताना या नकळत होणाऱ्या चुका टाळा, पर्सनल लोन घेताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, जाणून घ्या
x

Multibagger Mutual Fund | श्रीमंत व्हायचय? या 5 शक्तिशाली म्युचुअल फंड योजना 1 वर्षात 133 टक्के परतावा देत आहेत, नोट करा

Multibagger Mutual Fund

Multibagger Mutual Fund | ICICI बँकेद्वारे भारतात अनेक गुंतवणूक योजना राबवल्या जातात. या म्युचुअल फंड योजनेत तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि दीर्घकाळात अप्रतिम परतावा कमवू शकता. या ICICI बँकेचा म्युच्युअल फंड व्यवसाय देखील खूप मोठा आहे. ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड ही भारतातील दुसरी सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन करणारी कंपनी आहे. ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड द्वारे अनेक गुंतवणूक योजना राबवल्या जातात. या सर्व म्युचुअल फंड योजनेचे एक्सपोजर इक्विटी व्यतिरिक्त कर्जातही आहे. ICICI Prudential ने अशा अनेक म्युच्युअल फंड योजना सुरू केल्या आहेत, ज्यांनी फक्त 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 94 टक्के ते 133 टक्के परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ अशा जबरदस्त म्युचुअल 5 योजनांची माहिती जे तुम्हाला भरघोस परतावा कमावून देऊ शकतात.

ICICI प्रुडेन्शियल कमोडिटीज फंड :
ICICI प्रुडेन्शियल कमोडिटीज म्युचुअल फंडाने गेल्या 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 133 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेत एकरकमी गुंतवणूक मर्यादा रक्कम किमान 5000 रुपये आहे. तर तुम्ही 100 रुपये जमा करून SIP गुंतवणूक सुरू करु शकता. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत, ICICI प्रुडेन्शियल कमोडिटीज म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 675 कोटी रुपये होती. या फंडाचे खर्चाचे प्रमाण 1.10 टक्के आहे. 15 ऑक्टोबर 2019 रोजी ही म्युचुअल फंड योजना सुरू करण्यात आली होती. हा म्युचुअल फंड प्रामुख्याने हिंदाल्को, टाटा स्टील, वेदांता, सेल, जिंदाल स्टेनलेस स्टील यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे लावतो. एक वर्षभरापूर्वी या म्युचुअल फंड योजनेत तुम्ही 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.33 लाख रुपये झाले असते.

ICICI प्रुडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर फंड :
ICICI प्रुडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर म्युचुअल फंडाने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 104 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेत एकरकमी गुंतवणूक मर्यादा रक्कम किमान 5000 रुपये आहे. तुम्ही किमान 100 रुपये जमा करून या योजनेची SIP सुरू करू शकता. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत, ICICI प्रुडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 1,632 कोटी रुपये होती. या फंडाचे खर्चाचे प्रमाण 1.79 टक्के आहे. ही म्युचुअल फंड योजना प्रामुख्याने भारती एअरटेल, एल अँड टी, अॅक्सिस बँक, एनटीपीसी, ओएनजीसी सारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे लावते.

ICICI प्रुडेंशियल इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड :
ICICI प्रुडेन्शियल इंडिया अपॉर्च्युनिटी म्युचुअल फंडाने गेल्या 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 99 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल योजनेत एकरकमी गुंतवणूक मर्यादा किमान 5000 रुपये आहे. तुम्ही किमान 100 रुपये जमा करून या म्युचुअल फंडात SIP गुंतवणूक करू शकता. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत ICICI प्रुडेंशियल इंडिया अपॉर्च्युनिटीज म्युचुअल फंडची एकूण मालमत्ता 4,090 कोटी रुपये होती. या म्युचुअल फंडाचे खर्चाचे प्रमाण 0.69 टक्के होते. या म्युचुअल फंड योजनेची प्रमुख गुंतवणूक भारती एअरटेल, सन फार्मा, अॅक्सिस बँक, गेल, एनटीपीसी, ओएनजीसी, एसबीआय या मोठ्या कंपनीत आहे.

ICICI प्रुडेन्शियल स्मॉलकॅप म्युचुअल फंड :
ICICI प्रुडेन्शियल स्मॉलकॅप म्युचुअल फंडाने गेल्या 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 97.91 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेत किमान एकरकमी गुंतवणूक मर्यादा रक्कम 5000 रुपये आहे. तुम्ही किमान 100 रुपयांची SIP गुंतवणूक करून या म्युचुअल फंडची SIP सुरू करू शकता. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत ICICI प्रुडेन्शियल स्मॉलकॅप म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 2,961 कोटी रुपये आहे. या म्युचुअल फंडाचे खर्चाचे प्रमाण 0.66 टक्के आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या माध्यमातून प्रामुख्याने महिंद्र लाइफ स्पेस, व्ही-मार्ट, आयनॉक्स, बिर्लासॉफ्ट या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे लावले जातात.

ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी म्युचुअल फंड :
ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी म्युचुअल फंडाने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 94.48 टक्के वार्षिक परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेत एकरकमी किमान गुंतवणूक मर्यादा 5000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही किमान 100 रुपये जमा करून या म्युचुअल फंडमध्ये SIP सुरू करू शकता. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत, ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी म्युचुअल फंडची एकूण मालमत्ता मूल्य 5,037 कोटी रुपये नोंदवले गेले होते. या फंडाचे खर्चाचे एकूण प्रमाण 0.96 टक्के आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या माध्यमातून इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा, एचसीएल यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे लावले जातात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| ICICI Prudential Multibagger Mutual Fund investment opportunities and return on investment on 01 April 2023.

हॅशटॅग्स

Multibagger Mutual Fund(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x