27 November 2022 5:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus 11 5G Smartphone | लाँचिंगपूर्वी वनप्लस 11 स्मार्टफोनची माहिती लीक, फीचर्स आणि किंमत पहा Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ? Drishyam 2 Box Office | अजय देवगनच्या सिनेमाने मोडले अनेक रेकॉर्ड्स, शनिवारी मोठी कमाई, किती कलेक्शन?
x

Top Mutual Fund | पैशाची चिंता? या म्युच्युअल फंडाच्या योजना वर्षाला सरासरी 21% परतावा देतील, सेव्ह लिस्ट

Top Mutual fund

Top Mutual Fund | आर्थिक मंदी, वाढती महागाई, जागतिक भौगोलिक-राजकीय तणाव, व्याजदर वाढ आणि संभाव्य स्टॉक मार्केट क्रॅशच्या भीतीमुळे जगभरातील शेअर बाजारांवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव दिसून येत आहे. सध्या सर्व शेअर बाजारात अनिश्चितता असून इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याबाबत संभ्रम आणि अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. शेअर बाजार सध्या विक्रमी उच्चांक पातळीवर ट्रेड करत असला तरी त्याला पडायला जास्त वेळ लागणार नाही. गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून ते गोंधळात अडकले आहेत की, की इक्विटीच्या मध्ये पैसे गुंतवावेत की गुंतवू नये. अशा परिस्थितीत मल्टीकॅप फंड डायव्हिंग मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना थोडा दिलासा मिळू शकतो. गुंतवणूक तज्ज्ञही सध्या सुरक्षित गुंतवणुकीसाठी मल्टीकॅप म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावण्याचा सल्ला देत आहेत.

सुरक्षित गुंतवणूक पर्याय :
मल्टीकॅप म्युचुअल फंड हे एक वैविध्यपूर्ण इक्विटी म्युच्युअल फंड असून याच्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्केट कॅपमधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप अशा विविध सर्व आकारच्या बाजार भांडवल असलेल्या शेअर्सचा समावेश होतो. SEBI च्या निर्देशांनुसार, या मल्टीकॅप म्युचुअल फंडाना आपल्या पोर्टफोलिओपैकी 75 टक्के भांडवल इक्विटीमध्ये आणि इक्विटी संबंधित साधनांमध्ये लावावे लागते.

मल्टीकॅप म्युचुअल फंडचे वैशिष्ट्य :
BPN Fincap चे तज्ञ म्हणतात की, सध्याच्या अस्थिर बाजाराच्या स्थितीकडे पाहता मल्टीकॅप इक्विटी म्युचुअल फंड एक सुरक्षित आणि मजबूत परतावा देणारा गुंतवणूक पर्याय सिद्ध होऊ शकतो. SEBI च्या नवीन नियमांनुसार आता मल्टीकॅप श्रेणीतील म्युचुअल फंडाना आपला 75 टक्के निधी इक्विटीमध्ये गुंतवणे बंधनकारक राहील. हे फंड हाऊस लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये 25-25 टक्के रक्कम गुंतवणूक करू शकतात. म्युच्युअल फंड हाऊस मल्टीकॅप म्युचुअल फंडांचे पुनर्संतुलन आपल्या सोयीनुसार करू शकतात. त्यांना दुसऱ्या योजनेत जाण्याचा पर्यायही उपलब्ध असेल. ते युनिटधारकांनाही हा पर्याय उपलब्ध करून देऊ शकतात. चला तर जाणून या प्रकारच्या फंड किती परतावा देतात.

क्वांट अॅक्टिव्ह फंड :
* 10 वर्षांचा सरासरी वार्षिक परतावा : 20.75 टक्के
* 1 लाख गुंतवणूकीवर मिळणारा परतवा : 6.59 लाख
* 10 वर्षांत SIP मध्ये मिळणारा परतावा सरासरी वार्षिक : 22 टक्के
* 10 वर्षांमध्ये 10000 SIP चे गुंतवणूक मूल्य : 45.78 लाख रुपये

इन्वेस्को इंडिया मल्टीकॅप फंड :
* 10 वर्षांचा सरासरी वार्षिक परतावा : 17 टक्के
* 1 लाख गुंतवणुकीवर मिळणारा परतावा : 4.81 लाख
* 10 वर्षांत SIP सरासरी वार्षिक परतावा : 15.56 टक्के
* 10 वर्षात 10000 रुपये SIP गुंतवणूकीचे मूल्य : 31.34 लाख रुपये

सुंदरम मल्टी कॅप फंड :
* 10 वर्षांचा सरासरी वार्षिक परतावा : 15.54 टक्के
* 10 वर्षांत 1 लाख गुंतवणूकीचे मूल्य : 4.23 लाख
* 10 वर्षांचा SIP परतावा : 15.61 टक्के सरासरी वार्षिक
* 10 वर्षांत 10000 SIP चे मूल्य : 31.43 लाख रुपये

ICICI प्रुडेन्शियल मल्टीकॅप फंड :
* 10 वर्षांचा सरासरी परतावा : 15.04 टक्के
* 10 वर्षांत 1 लाख गुंतवणूकीचे मूल्य : 4.07 लाख
* 10 वर्षांचा SIP परतावा : 14.46 टक्के सरासरी वार्षिक
* 10 वर्षांत 10000 SIP चे मूल्य : 29.41 लाख रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List Of Top Mutual fund scheme for investment in Multicap Fund on 24 November 2022.

हॅशटॅग्स

Top Mutual fund(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x