1 December 2022 8:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Limit | खासगी नोकरदारांना आता 25000 रुपये पेन्शन मिळणार, तुमचे पैसे 333 टक्क्यांनी असे वाढणार पहा ITR Filling | तुमची यामार्गे सुद्धा कमाई होते का? इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते, टॅक्स भरावा लागणार Quick Money Share | झटपट पैसा! या शेअरने 3 महिन्यांत 147 टक्के परतावा दिला, वेगाने पैसे वाढवत आहे हा स्टॉक, नोट करा Money From IPO | हा IPO दुसऱ्या दिवशी 6 पट सबस्क्राइब झाला, ग्रे मार्केटमध्ये 55 रुपयांचा प्रीमियम, मोठ्या कमाईचे संकेत Equity Mutual Fund | इक्विटी फंडात पैसे गुंतवता? चांगले फंड कसे निवडावे आणि खराब फंडमधून कधी बाहेर पडावे? जाणून घ्या Talathi Bharti 2022 | राज्यात 4122 जागांसाठी तलाठी महाभरती, त्वरित ऑनलाइन अर्ज करा PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 285 पदांची भरती, पटापट अर्ज करा
x

Mutual Fund Investment | बँकेच्या वार्षिक व्याजदरांपेक्षा 3-4 पटीने या म्युच्युअल फंड योजना परतावा देतं आहेत, श्रीमंत करणाऱ्या फंडाची यादी

Mutual funds investment

Mutual Fund Investment | शेअर बाजारात गुंतवणूक करताना गुंतवणुकीचे सर्व पर्याय समजून घेतल्यानंतरच पैसे गुंतवणूक करा. पैसे गुंतवणूक करताना कुठे गुंतवणूक करावी याचा अभ्यास करणे, आणि सर्व माहिती जाणून घेणे, खूप गरजेचे आहे. गुंतवणुक बाजारात चांगला परतावा मिळवण्यासाठी म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय मानला जातो. गुंतवणूकदार कोणत्याही वयाचा असो, अगदी लहानपणापासूनही आपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतो. गुंतवणूक करून आपले आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे सर्वोत्तम साधन मानले जाते. म्युच्युअल फंड हा शेअर बाजाराच्या अधीन राहून गुंतवणूकदारांना परतावा देत असतो. त्यामुळे हा गुंतवणूक पर्याय थोडाफार असुरक्षितही मानला जातो. परंतु जर तुम्ही म्युच्युअल फंडात हुशारीने आणि दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर तुम्ही त्यातून चांगला परतावा मिळवू शकता.

आर्थिक उद्दिष्टे निश्चित करावे :
गुंतवणूकदाराना म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या कालावधीची सुविधा दिली जाते. गुंतवणूकदार अल्प मुदतीसाठी, मध्यम कालावधीसाठी आणि दीर्घ मुदतीसाठी आपले पैसे योग्य त्या म्युचुअल फंडमधे गुंतवणूक करू शकतात. म्युचुअल फंड मध्ये आपल्या वेगवेगळ्या आर्थिक उद्दिष्टांसाठी वेगवेगळ्या श्रेणीतील म्युचुअल फंड योजना उपलब्ध आहेत. म्हणूनच गुंतवणूक तज्ञ नेहमी आपल्या ग्राहकांना सल्ला देतात की, गुंतवणूक करण्याआधी नेहमी आपले आर्थिक उद्दिष्टे निश्चित करावे आणि त्यानंतरच गुंतवणूक करावे. तुम्ही तुमचे आर्थिक ध्येय निश्चित करून म्युचुअल फंडच्या माध्यमातून चांगला परतावा कमवू शकता.

गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करताना :
आपला गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करताना आक्रमक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे. आपला प्रॉफीटेबल पोर्टफोलिओ तयार आपण थोडा आक्रमक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. तुम्ही म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करताना लार्ज कॅप, मिड-कॅप आणि फ्लेक्सी कॅप फंड मध्ये तुमच्या गुंतवणुक करून आपल्या पोर्टोलिओ मध्ये विविधता आणू शकता. स्मॉल कॅप फंडांमध्येही गुंतवणूक करण्याचा विचार चांगला आहे,पण त्यात जोखीम जास्त असते. सुरुवातीला मिळणारा परतावा 10 टक्के पर्यंत असू शकतो. या लेखात आम्ही तुमच्यासाठी काही जबरदस्त म्युचुअल फंडस् शोधून आणले आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळवून दिला आहे.

खाली दिलेली यादी ही काही सर्वोत्तम परतावा देणाऱ्या म्युचुअल फंडांची आहे. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर पणे :

तुम्ही या म्युचुअल फंडात दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून गुंतवणूक करू शकता . 

* कोणताही निफ्टी इंडेक्स फंड : 18 टक्के
* कॅनरा रोबेको ब्लूचिप फंड : 18 टक्के
* पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंड : 18 टक्के
* मिरे इमर्जिंग ब्लूचिप फंड : 18 टक्के
* IIFL फोकस्ड इक्विटी फंड : 18 टक्के
* कोटक इमर्जिंग इक्विटी फंड : 10 टक्के

अनेक गुंतवणूकदार दरवर्षी त्यांच्या एसआयपी गुंतवणुकीत थोडी फार वाढ करत असतात. या धोरणाचा अवलंब करून ते दीर्घकाळात शिस्तबद्ध गुंतवणूक करत असतात. ह्याचा फायदा त्यांना परताव्याच्या रुपात मिळत असतो. म्युचुअल फंड तज्ञही आपल्या ग्राहकांना दर वर्षी काही प्रमाणात गुंतवणुकीच्या रकमेत थोडी वाढ करण्याचा सल्ला देतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Mutual funds investment tips and list for investment on 16 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x