 
						Multibagger Mutual Funds | गुंतवणूक बाजारात म्युच्युअल फंडाच्या विविध श्रेणींअधिक अनेक योजना उपलब्ध आहेत. या श्रेणीमध्ये इक्विटी, डेट, हायब्रीड अशा प्रकारच्या योजनांचा समावेश होतो. विविध श्रेणींमधील योजनांचा परतावा देखील वेगवेगळा असतो. यापैकी एक श्रेणी म्हणजे ‘मल्टी कॅप फंड’. इक्विटी म्युच्युअल फंडाच्या ‘मल्टी कॅप फंड’ श्रेणीतील योजना गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून देतात. ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ म्हणजेच ‘AMFI’ च्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2023 मध्ये मल्टी कॅप म्युचुअल फंडांमध्ये एकूण 1773 कोटी रुपयांची गुंतवणूक वाढली आहे. जर तुम्ही मल्टी कॅप म्युचुअल फंडांच्या कामगिरीवर नजर टाकली तर तुम्हाला संजेल की, टॉप 5 योजनांनी मागील काही वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. यातील काही योजनानी तर गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.
शीर्ष 5 मल्टी कॅप म्युचुअल फंड योजनांची लिस्ट :
क्वांट अॅक्टिव्ह फंड :
क्वांट ऍक्टिव्ह म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 32.16% परतावा मिळवून दिला आहे. या योजनेमध्ये 3 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 2.30 लाख रुपये झाले आहे. या योजनेची एकरकमी गुंतवणूक करण्याची किमान मर्यादा 5,000 रुपये आहे. तर किमान एसआयपी गुंतवणूक मर्यादा 1000 रुपये आहे.
महिंद्रा मॅन्युलाइफ मल्टी कॅप म्युचुअल फंड :
महिंद्रा मॅन्युलाइफ मल्टी कॅप ग्रोथ म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 21.16% परतावा मिळवून दिला आहे. या योजनेमध्ये 3 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 1.77 लाख रुपये झाले आहे. या योजनेची एकरकमी गुंतवणूक करण्याची किमान मर्यादा 1,000 रुपये आहे. तर किमान एसआयपी गुंतवणूक मर्यादा 500 रुपये आहे.
निप्पॉन इंडिया मल्टी कॅप फंड :
निप्पॉन इंडिया मल्टी कॅप म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 18.92% परतावा मिळवून दिला आहे. या योजनेमध्ये 3 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 1.68 लाख रुपये झाले आहे. या योजनेची एकरकमी गुंतवणूक करण्याची किमान मर्यादा 1,000 रुपये आहे. तर किमान एसआयपी गुंतवणूक मर्यादा 1000 रुपये आहे.
बडोदा बीएनपी परिबस मल्टी कॅप फंड :
बडोदा BNP परिबास मल्टी कॅप म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 17.56% परतावा मिळवून दिला आहे. या योजनेमध्ये 3 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 1.62 लाख रुपये झाले आहे. या योजनेची एकरकमी गुंतवणूक करण्याची किमान मर्यादा 5,000 रुपये आहे. तर किमान एसआयपी गुंतवणूक मर्यादा 500 रुपये आहे.
ICICI प्रुडेन्शियल मल्टीकॅप फंड :
ICICI प्रुडेंशियल मल्टी कॅप म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 16.92% परतावा मिळवून दिला आहे. या योजनेमध्ये 3 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 1.59 लाख रुपये झाले आहे. या योजनेची एकरकमी गुंतवणूक करण्याची किमान मर्यादा 5,000 रुपये आहे. तर किमान एसआयपी गुंतवणूक मर्यादा 100 रुपये आहे.
मल्टी कॅप फंड म्हणजे काय? :
मल्टीकॅप म्युचुअल फंड मुख्यतः सर्व प्रकारच्या मार्केट कॅप असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे लावतात. स्टॉक मार्केट रेग्युलेटर सेबीने नुकताच एक नवीन नियम आणला आहे, त्यानुसार मल्टी कॅप म्युचुअल फंड हाऊसने इक्विटीमध्ये 75 टक्के पैसे गुंतवणे बंधनकारक केले आहे. त्याच वेळी, मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये 25-25 टक्के गुंतवणूक करण्याचे बंधन त्यांच्यावर टाकण्यात आले आहे. पूर्वी मल्टी कॅप म्युचुअल फंड योजनेमध्ये लार्ज कॅप्स स्टॉकचे वेटेज जास्त होते. तथापि, म्युच्युअल फंड हाऊस मल्टी कॅप फंडांचे पुनर्संतुलन करू शकतात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		