 
						Mutual Fund Investment 2023 | म्युचुअल फंड SIP योजना लोकांमध्ये वेगाने लोकप्रिय होत आहेत. म्युच्युअल फंड SIP मध्ये 13,000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. सध्या जर तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला क्रिसिलने क्रमांक 1 रेटिंग दिलेल्या टॉप 5 सर्वोत्तम म्युच्युअल फंड योजनाची माहिती देणार आहोत.
एसबीआय कॉन्ट्रा फंड :
CRISIL ने SBI कॉन्ट्रा म्युचुअल फंडला क्रमांक 1 रेटिंग दिली आहे. हा म्युचुअल फंड मुख्यतः इक्विटी आणि इक्विटी संबंधित सिक्युरिटीजमध्ये पैसे गुंतवणूक करतो. इक्विटी आणि इक्विटी संबंधित पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करणे हे, या म्युचुअल फंडाचे उद्देश्य आहे. या म्युचुअल फंडाने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 31.85 टक्के परतावा कमावून दिला आहे. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँक या एसबीआय कॉन्ट्रा म्युचुअल फंडाच्या टॉप होल्डिंग्सपैकी एक आहेत. परंतु हा म्युचुअल फंड इक्विटीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवत असल्याने त्यात गुंतवणूक करणे थोडे जोखमीचे आहे.
क्वांट स्मॉल कॅप फंड :
या म्युचुअल फंडला क्रिसिलने प्रथम क्रमांकाची रेटिंग दिली आहे. हा म्युचुअल फंड मुख्यतः स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करत. दीर्घकालीन वाढीच्या संधी उपलब्ध करून देणे हे या म्युचुअल फंड योजनेचे प्राथमिक गुंतवणूक उद्दिष्ट आहे. पण गुंतवणूक करताना नेहमी लक्षात ठेवा की, या योजनेत गुंतवणुक केल्यास उद्दिष्ट साध्य होईल याची गॅरंटी नाही. या म्युचुअल फंडाने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 56 टकले सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे.
फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप फंड :
फ्लेक्सी कॅप असल्याने, फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप म्युचुअल फंडमध्ये जोखीम फक्त कमी आहे. कारण हा म्युचुअल फंड इक्विटी, निश्चित उत्पन्न सिक्युरिटीज आणि मनी मार्केट साधनांमध्ये पैसे लावून संपत्ती निर्माण करतो. हा म्युचुअल फंड आपल्या गुंतवणूकदारांना नियमित लाभांशही देतो. या म्युचुअल फंडाने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक आधारावर 21 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंडने ICICI बँक, HDFC बँक, अॅक्सिस बँक, भारती एअरटेल आणि इन्फोसिस या सारख्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणत गुंतवणूक केली आहे. या म्युचुअल फंडाची 66 टक्के गुंतवणूक ही लार्ज कॅप स्टॉक होल्डिंगमध्ये गुंतलेली आहे.
SBI लार्ज अँड मिडकॅप फंड :
जर तुम्ही लार्ज आणि मिड कॅप दोन्ही फंडांचे संयोजन असलेल्या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणुक करु इच्छित असाल तर, हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहे. या म्युचुअल फंड योजनेला CRISIL द्वारे प्रथम क्रमांकाची रेटिंग देण्यात आली आहे. हा म्युचुअल फंड आपल्या गुंतवणूकदारांना प्रामुख्याने लार्ज कॅप आणि मिड कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये अप्रत्यक्ष रीत्या गुंतवणूक करण्याची संधी मिळवून देतो. या म्युचुअल फंडाने मागील 3 वर्षांत सरासरी वार्षिक 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर वार्षिक आधारावर फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना 5 वर्षांत सरासरी 13.47 टक्के परतावा कमावून दिला आहे.
पराग पारिख टॅक्स सेव्हर फंड :
ही म्युचुअल फंड स्कीम एक प्रकारची इक्विटी लिंक्ड बचत योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर सवलत दिली जाते. या म्युचुअल फंडाने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 24 टक्के परतावा मिळवून दिला आहे. पराग पारिख टॅक्स सेव्हर फंडने एचडीएफसी, बजाज होल्डिंग्ज, आयटीसी यासारख्या सारख्या मोठ्या स्टॉकमध्ये पैसे लावले आहेत. या म्युचुअल फंडाची इक्विटी शेअर्समध्ये होल्डिंग 84 टक्के आहे. या म्युचुअल फंड योजनेला क्रिसिलने प्रथम क्रमांक रेटिंग दिले आहेत. वरील सर्व म्युचुअल फंड 2023 या वर्षात भरघोस परतावा देऊ शकतात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		