15 December 2024 8:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स अल्पावधीत देतील 30 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला

Adani Port Share Price

Adani Port Share Price | मागील आठवड्यात अदानी समुहाच्या कंपन्याचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत होते. अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांनी आपल्या सर्वात मोठ्या दोन गुंतवणूकदारांना 5 दिवसांत 19,500 कोटी रुपये नफा कमावून दिला आहे. या दोन गुंतवणूकदारमध्ये GQG पार्टनर आणि LIC कंपनी आहे. सप्टेंबर 2023 तिमाहीच्या डेटानुसार शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार राजीव जैन यांच्या GQG पार्टनर कंपनीने अदानी समूहाच्या 6 कंपन्यामध्ये गुंतवणूक केली आहे.

राजीव जैन यांच्या अदानी समुहाच्या कंपन्यांमधील गुंतवणुकीचे मूल्य 28 टक्के म्हणजेच जवळपास 7,287 कोटी रुपयांनी वाढून 32,887 कोटी रुपयेवर पोहचले आहेत. आज मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी अदानी पोर्ट कंपनीचे शेअर्स 0.89 टक्के वाढीसह 1,041.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी समूहाच्या 7 कंपन्यांच्या शेअर्समध्ये एलआयसी कंपनीच्या गुंतवणुकीचे मूल्य 12,234 रुपयेने वाढून 58,017 कोटी रुपयेवर पोहोचले आहे. हिंडनबर्ग फर्मने वादग्रस्त अहवाल जाहीर केल्यानंतर मार्च महिन्यात GOG पार्टनर्स कंपनीने अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एनर्जी सोल्युशन आणि अदानी एंटरप्रायझेस कंपन्यामध्ये 15446 कोटी रुपये मूल्याची गुंतवणूक केली होती. यानंतर त्यांनी अदानी पॉवर आणि अंबुजा सिमेंट्स कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. एलआयसी या विमा कंपनीने ACC कंपणी वगळता सर्व अदानी समुहाच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे.

मागील आठवड्यातील शेअर बाजाराच्या तेजीमुळे अदानी समुहाच्या 10 कंपन्यांचे मूल्य 3.14 लाख कोटी रुपयेने वाढून 14.36 लाख कोटी रुपयेवर पोहचले आहेत. 2023 या वर्षात अदानी समुहाच्या कंपन्यांनी दिलेला हा सर्वोत्तम साप्ताहिक नफा आहे. मागील आठवड्यात अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे शेअर्स दुहेरी अंकात वाढले आहेत.

अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना सर्वाधिक म्हणजेच 65 टक्के नफा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते अदानी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंट कंपनीचे शेअर्स अजूनही तेजीचे संकेत देत आहेत. या शेअर्समध्ये अजूनही 25-30 टक्के वाढ पाहायला मिळू शकते. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअरवर 1,210 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Port Share Price NSE 12 December 2023.

हॅशटॅग्स

Adani Port Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x