27 March 2023 11:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Khadim India Share Price | या कंपनी व्यवस्थापनतील फेरबदलांमुळे हा शेअर फोकसमध्ये आला, गुंतवणूक करावी का? Stocks To Buy | स्वस्त शेअर आश्चर्यकारक परतावा, किंमत 100 रुपयांपेक्षा ही कमी, अल्पावधीत मिळणार 60 टक्के परतावा, लिस्ट सेव्ह करा SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या
x

Mutual Funds | अरे देवा! लोकं कार खरेदीपेक्षा म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत आहेत, SIP गुंतवणूक वाढीचे कारण काय?

Mutual Fund

Mutual Funds | आजकाल सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये भारतातील SIP गुंतवणुकीचे मूल्य 13000 कोटी रुपयांपेक्षा जास्त नोंदवले गेले होते. आर्थिक मंदीचे नकारात्मक घटक, भौगोलिक-राजकीय अस्थिरता आणि युद्ध यासारख्या कारणांमुळे जगातील सर्व प्रमुख देशांतील शेअर बाजारात अस्थिरता पसरली आहे. भारतात एसआयपीद्वारे गुंतवणूक वाढल्याने भारतीय बाजार इतर देशांच्या तुलनेत खूप स्थिर वाढ करत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच शेअर बाजार जबरदस्त कामगिरी करत आहे.

एसआयपीमुळे कार विक्रीवर परिणाम :
जगातील प्रसिध्द लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझच्या अधिकाऱ्यानी म्हंटले आहे की, भारतात लोक एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्यास जास्त पसंती देत आहेत. त्यामुळे लक्झरी वाहनांच्या विक्रीत घट झाली आहे. लोकांनी एसआयपीमध्ये गुंतवणूक वाढवल्यामुळे लक्झरी कार उत्पादक कंपन्यांचे नुकसान होत आहे. कारण लोक महाग वाहने खरेदी करण्योएक्षा एसआयपी गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत.

भारताची आर्थिक कामगिरी :
2020 मध्ये चीन मधून निघालेल्या कोरोना विषाणूमुळे जगात महामारी पसरली होती. या महामारीमुळे जगातील बहुतेक देशांत लॉकडाऊन लावण्यात आले होते. भारतातही लॉक डाऊन लावण्यात आला होता. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळली होती. लॉकडाऊनमुळे भारतीय शेअर बाजारही पडला होता. सेन्सेक्स 42000 वरून ते 27000 च्या खाली आला होता तर निफ्टी 12400 वरून 7500 पर्यंत पडला होता. बाजारातील मोठ्या घसरणीमुळे किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर बाजारात एंट्री घेण्याची सुवर्ण संधी मिळाली होती. किरकोळ गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात विक्रमी रक्कम गुंतवणूक केली होती, त्यामुळे शेअर बाजारात कमालीची वाढ झाली आणि भारतीय स्टॉक मार्केट सावरला. कोरोना काळात परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणत आपले पैसे काढून घेतले होते, परंतु आता परकीय गुंतवणूकदार पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारावर आपला विश्वास दाखवत आहेत. भारतात आता डिमॅट खारेदरांची संख्या 100 दशलक्षांपेक्षा अधिक झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual Fund Investment opportunities and returns in long term on 01 December 2022.

हॅशटॅग्स

mutual fund(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x