1 April 2023 10:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRCTC Railway Ticket | अचानक गाव-शहरात ट्रेनने जावं लागतंय अन तिकीट नाही? नो टेन्शन, हा नियम मदत करेल Post Office Scheme | या सरकारी मासिक उत्पन्न योजनेत शून्य रिस्कवर गुंतवणूक करा, दरमहा 4950 रुपये मिळतील, पूर्ण माहिती जाणून घ्या Deep Industries Share Price | हा शेअर स्प्लिट होतोय, शेअरची किंमत पाच पट घटणार, खरेदी करणार? IFL Enterprises Share Price | ही कंपनी गुंतवणुकदारांना दुहेरी फायदा देणार, कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सची घोषणा Apollo Pipes Share Price | या कंपनीच्या शेअरची किंमत इतक्या तेजीत वाढली की गुंतवणुकदार करोडपती झाले, परतावा पाहून गुंतवणूक करा April Month Horoscope | एप्रिल महिन्यात 12 राशींमध्ये कोणाला नशिबाची साथ? कोणासाठी मोठी संधी? तुमचं मासिक राशीभविष्य वाचा Odysse Vader e-Bike | ओडिसे वडर ई-बाइक लॉन्च, फुल चार्ज वर 125 किमी रेंज, 999 रुपये टोकन देऊन बुक करा
x

Mutual Fund Investment | एसआयपी गुंतवणूक का फायद्याची असते? ही 4 कारणे सर्व संभ्रम दूर करतील, नफ्याची माहिती

Mutual Fund investment

Mutual Fund Investment | आजकाल म्युचुअल फंडमध्ये सिस्टिमॅटिक पद्धतीने गुंतवणूक करण्याचे ट्रेण्ड वाढत चालले आहे. एसआयपी पद्धतीने लोक म्युचुअल फंड मध्ये अधिक गुंतवणुक करु लागले आहेत. म्युच्युअल फंडात दोन पद्धतीने गुंतवणूक करता येते, एकरकमी आणि SIP. एसआयपी पद्धतीने म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास शेअर बाजारातील चढउतारात असलेली जोखीम मोठ्या प्रमाणात कमी होती. म्युचुअल फंडमध्ये एसआयपी पद्धतीने गुंतवणूक सुरू करण्यासाठी तुम्हाला दरमहा 500 रुपये जमा करावे लागेल. म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी पद्धतीने गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात उत्तम परतावा कमावता येतो. SIP मधील गुंतवणूक इतर योजनांपेक्षा मजबूत परतावा कमावून देते. चला तर मग जाणून घेऊ SIP गुंतवणुकीचे तपशील. (Mutual Fund Scheme, Mutual Fund SIP – Direct Plan | Mutual Fund latest NAV today | Mutual Fund latest NAV and ratings)

SIP योजना फ्लेगझीबल असते :
SIP मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला खुप जास्त रक्कम जमा करण्याची गरज नाही. तुम्ही दरमहा फक्त 500 रुपये गुंतवणूक करून SIP मधून दीर्घकाळात भरघोस परतावा कमवू शकता. तुमचे उत्पन्न वाढल्यावर तुम्ही तुमच्या सोयीनुसार SIP ची रक्कम बूस्ट करु शकता. याशिवाय SIP मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही गुंतवणूकीचे पर्यायही देण्यात येतात. कोणतेही आर्थिक संकट किंवा अडचण असल्यास तुम्ही एसआयपी गुंतवणूक थांबवू शकत. म्हणजेच ही योजना तुम्हाला कमालीची लवचिकता प्रदान करते.

SIP स्कीम दीर्घकाळात चांगला परतावा देते :
इतर गुंतवणूक योजनांच्या तुलनेत म्युचुअल फंड योजना दीर्घकाळात चांगला परतावा कमावून देते. SIP योजनेत गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळतो. याशिवाय, कोणतीही म्युचुअल फंड एसआयपी स्कीम वार्षिक सरासरी 12-15 टक्क्यांपर्यंत परतावा मिळवून देते. काही योजना यापेक्षा अधिक परतावा देतात. अशा परिस्थितीत, एसआयपी पद्धतीने गुंतवणूक करून तुम्ही दीर्घकाळात मोठा फंड तयार करू शकता, आणि तुमची मोठी स्वप्ने देखील पूर्ण करू शकता.

बाजारातील चढ उताराचा फायदा :
जेव्हा तुम्ही SIP मध्ये दीर्घकाळ नियमित गुंतवणुक करता, तेव्हा तुम्हाला रुपयाच्या सरासरी खर्चाचा फायदा मिळतो. म्हणजेच, समजा जर शेअर बाजारात पडझड सुरू असेल आणि तुम्ही म्युचुअल फंड SIP मध्ये गुंतवणूक सुरू केली, तर तुम्हाला कमी किमतीत जास्त युनिट्स मिळतील. आणि जेव्हा शेअर मार्केट तेजीत असताना तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक केली तर, तुम्हाला जास्त किमतीत कमी युनिट्स वाटप केले जातील. शेअर बाजारातील चढ-उताराच्या परिस्थितीत तुमच्या गुंतवणुकीचे मूल्यही कमी-जास्त होत राहते. म्हणजेच जर शेअर बाजार घसरला तरी तुम्ही तोट्यात जाणार नाही, पण जेव्हा बाजार तेजीत येईल, तेव्हा तुम्हाला सरासरी गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल.

SIP मुळे बचतीची सवय लागते :
SIP च्या माध्यमातून दरमहा तुमची एक ठराविक रक्कम बचत केली जाते. म्हणजेच एसआयपी च्या माध्यमातून दरमहा तुमची मासिक बचत ही होते, आणि त्यावर तुम्हाला जबरदस्त परतावा ही मिळतो. SIP रक्कम जमा केल्यावर उत्पन्नातील बाकीची रक्कम तुम्ही खर्च करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला शिस्तबद्ध गुंतवणुकीची सवयही लागते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mutual Fund investment schemes for good return check details on 27 January 2023.

हॅशटॅग्स

#Mutual Fund Investment(198)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x