Mutual Fund NFO | म्युच्युअल फंडामार्फत सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करा, फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करा, जबरदस्त योजना

Mutual fund NFO | प्रसिद्ध म्युच्युअल फंड कंपनी मोतीलाल ओसवाल अॅसेट मॅनेजमेंटने आपल्या ग्राहकांना गोल्ड ईटीएफ आणि सिल्व्हर ईटीएफच्या युनिट्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळावी आणि भरघोस नफा कमावता यावा, यासाठी मोतीलाल ओसवाल गोल्ड आणि सिल्व्हर EFT FOF लॉन्च केले आहेत. ही योजने अंतर्गत गोल्ड आणि सिल्व्हर EFT च्या युनिट्समध्ये गुंतवणूक करणे शक्य होईल आणि भरघोस परतावा कमावता येईल. हा NFO 26 सप्टेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. आणि 7 ऑक्टोबर 2022 रोजी बंद होईल. फंड ओपनिंग 13 ऑक्टोबर 2022 रोजी केली जाईल. ही एक ओपन एंडेड फंड स्कीम आहे. म्हणजेच गुंतवणूकदार त्यांना हवे तेव्हा योजना बंद करून यातून पैसे काढू शकतो.
गुंतवणूक रक्कम :
तुम्ही या योजनेत फक्त 500 रुपये पासून गुंतवणूक सुरू करू शकता. मोतीलाल ओसवाल AMC च्या मते, मोतीलाल ओसवाल गोल्ड आणि सिल्व्हर ETF FOF साठी अर्जाची किमान रक्कम 500 रुपये असेल. तुम्हाला जर या फंड मधे गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराद्वारे किंवा मोतीलाल ओसवाल AMC च्या वेबसाइटवर लॉग इन करून या युनिट्सची खरेदी करू शकतात. त्यानंतर, ETF/FOF साठी अर्जाची किमान रक्कम 500 रुपये असेल. या गोल्ड आणि सिल्व्हर ETF फंडाचा बेंचमार्क भारतीय बाजारातील सोन्याची किंमत असेल.
ही योजना गोल्ड आणि सिल्व्हर ETF च्या युनिट्समध्ये गुंतवणूक करून तुम्हाला भरघोस परतावा मिळवून देईल. आणि या योजने अंतर्गत सोन्यातील दैनंदिन वेटेज प्रमाणे मार्केट-ऑपरेट केले जाईल आणि ओपनिंग वाटप 70:30 या प्रमाणात असेल. कमाल वेतेज 90 टक्के निश्चित करण्यात आले आहे, ज्याचा दर तिमाहीत आढावा घेतला जाईल. सोन्यासाठी प्रारंभिक वाटप त्याच्या उच्च आर्थिक मूल्यानुसार आणि अधिक तरलतेनुसार होते. याव्यतिरिक्त, सोने चांदीच्या किमतीपेक्षा अधिक स्थिर आहे.
पात्र गुंतवणूकदार कोण ?
मोतीलाल ओसवाल गोल्ड आणि सिल्व्हर ETF FOF मध्ये गुंतवणूकदार दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करू शकतात, आणि चांगला परतावा मिळवू शकतात. मोतीलाल ओसवाल अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे म्हणने आहे की, “ आपल्या गुंतवणूकदारांना नवीन गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोतीलाल ओसवाल AMC ने गोल्ड आणि सिल्व्हर ईटीएफ एफओएफ ची घोषणा केली आहे. हे एक उत्तम वैविध्यपूर्ण गुंतवणुकीचा पर्याय प्रदान करते, कारण सोने आणि चांदी या दोन्हींचा इक्विटीशी खूप कमी संबंध येतो आणि त्यामुळे यातील गुंतवणुकीत विविधीकरणाचा अधिक फायदा होतो. घसरत्या शेअर बाजाराच्या तुलनेत सोने आणि चांदी दोन्ही धातूमधील गुंतवणुक जास्त सुरक्षितता देतात, आणि बाजारात चांगली कामगिरीही करतात. जेव्हा बाजार मंदीतून सावरतो तेव्हा चांदीमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळते. या योजनेमुळे, गुंतवणूकदार पोर्टेबल मालमत्तेचा आणि वाढत्या आर्थिक मूल्याचा फायदा घेत बाजारातील अस्थिरतेपासून सुरक्षित राहतील.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Mutual fund NFO from Motilal Oswal AMC for Gold and Silver ETF FOF investment opportunity 24 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल