
SIP Rule | शक्यतो प्रत्येक व्यक्तीची भविष्यातील काही स्वप्न असतात. कोणाला मोठा फ्लॅट खरेदी करायचा असतो तर, कोणाला स्वतःचा मोठा बिझनेस उभारायचा असतो. त्याचबरोबर काही व्यक्ती आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी देखील आधीपासून दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक करून ठेवतात. याच दीर्घकाळ गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींसाठी एसआयपी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन फायदेशीर ठरू शकतो. समजा तुम्हाला दुप्पटीने पैसे कमवायचे असतील तर गुंतवणुकीचा पैसा वसूल रूल माहित असायला हवा.
गुंतवणुकीचं योग्य प्लॅनिंग तसेच योग्य स्ट्रॅटर्जी वापरून तुम्ही 1 करोड नाही तर तब्बल 10 करोड रुपयांची रक्कम अगदी सहजपणे जमा करू शकता. तुम्ही सुद्धा विचार करा की, तुम्हाला दीर्घ काळाच्या गुंतवणूकनंतर 10 कोटीं रुपये मिळाले तरी, आर्थिक दृष्ट्या तुम्ही किती सक्षम व्हाल. चला तर एसआयपी रुलविषयी सविस्तरपणे जाणून घेऊ.
7-5-3-1 फॉर्म्युला
रुल 7 :
SIP चा रुल 7 असं सांगतो की, तुम्हाला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवणुकीची जास्तीत जास्त वर्षे द्यावी लागतील. तुम्ही किमान 7 वर्षे तरी SIP गुंतवणुकीचे सातत्य ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर एसआयपी ही मार्केट लिंक स्कीम असल्यामुळे तुम्ही मार्केट पडण्याला अजिबात घाबरले नाही पाहिजे. कारण की, कोविडमध्ये 40% ने मार्केट पडलेलं होतं तरीसुद्धा एसआयपीने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला होता.
रुल 5
1) ट्रॅक रेकॉर्ड : गुंतवणुकीचे मागील प्रदर्शन पाहून घ्या.
2) गुड क्वालिटी फंड : NFO पासून वाचा 3)एक्सपेन्स रेश्यो : फंड निवडताना 1% स्वस्त असलेला फंड निवडा.
4) होल्डिंग्स देखील चेक करा
5) इक्विटी अलोकेशन : तुम्ही इक्विटीमध्ये केवढी गुंतवणूक करणार आहात याविषयी आधीच समजून घ्या.
रुल 3 :
SIP मध्ये गुंतवणूक करताना या 3 गोष्टींची विशेष काळजी घ्या.
1) निगेटिव्ह रिटर्न फेज : SIP मध्ये 7-15% टक्क्यांपर्यंतचा निगेटिव्ह रिटर्न सामान्य मानला जातो.
2) पॅनिक फेज : 2008 सारख्या घटनांना अजिबात घाबरू नका.
3) इरिटेशन फेज : 1 ते 2 वर्षांत तुमचा फ्लॅट ग्रोथ अगदी आरामात होऊ शकते.
रुल 1 :
रुल 1 असं सांगतो की, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत प्रत्येक वर्षाला 10% ने पैसे वाढवायचे आहेत. म्हणजेच तुम्हाला स्टेप-अप एसआयपी करायची आहे. जेणेकरून तुम्ही फटाफट 10 करोडोंची रक्कम तयार करू शकाल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.