2 June 2023 10:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PCBL Share Price | पीसीबीएल शेअरने 77,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा, आता अजून 31 टक्के परतावा देईल, डिटेल्स पहा Rama Steel Tubes Share Price | जबरदस्त शेअर! मागील 3 वर्षांत रामा स्टील ट्यूब्स शेअरने गुंतवणूकदारांना 3660% परतावा दिला, डिटेल्स पहा Adani Total Gas Share Price | स्वस्त झालेला अदानी टोटल गॅस शेअर खरेदी करावा का? शेअर पुढे मोठा परतावा देईल? तज्ज्ञ काय सांगतात पहा Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 03 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 03 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Tega Industries Share Price | टेगा इंडस्ट्रीज शेअरने 1 वर्षात 115% परतावा दिला, तर मागील 1 महिन्यात 31% परतावा दिला, डिटेल्स पहा Gold Price Today | बापरे! आज सोन्याच्या दरांनी चिंता वाढवली, तुमच्या शहरात 10 ग्राम सोन्याचा नवा दर किती झाला पहा
x

Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा

Godawari Power and ISPAT Share Price

Godawari Power and ISPAT Share Price | छत्तीसगड राज्यात स्थित ‘हीरा ग्रुप’ चा भाग असलेल्या ‘गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड’ कंपनीमे शेअर बायबॅकची घोषणा केली आहे. कंपनी खुल्या बाजारातून 500 रुपये प्रति शेअर या किमतीवर 50 लाख शेअर्स परत खरेदी करणार आहे. ‘गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड’ कंपनीने 18 मार्च 2023 रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही बाय बॅकची घोषणा केली होती. (Godawari Power and ISPAT Limited)

कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडल्यानंतर ‘गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड’ कंपनीने सेबीला कळवले की, कंपनी प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्याचे 50 लाख शेअर्स खुल्या बाजारातून परत खरेदी करणार आहे. ‘गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड’ कंपनीने शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. म्हणजेच रेकॉर्ड तारीखपर्यंत ज्या लोकांचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये सामील राहील, त्यांना बायबॅकचा लाभ मिळेल. (Godawari Power and Ispat share price BSE)

मंगळवार दिनांक 21 मार्च 2023 रोजी ‘गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड’ कंपनीचे शेअर 2.38 टक्के घसरणीसह 375.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात ‘गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स फक्त 0.09 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याच वेळी ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअरमध्ये 6 महिन्यांपूर्वी पैसे लावले होते, त्यांना 34.31 टक्के परतावा मिळाला आहे. ‘गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 497.80 रुपये प्रति शेअर होती. आणि 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत प्रति शेअर 223 रुपये होती. (Godawari Power and Ispat share price NSE)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Godawari Power and ISPAT Share Price 532734 on 21 March 2023.

हॅशटॅग्स

Godawari Power and Ispat Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x