13 December 2024 3:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
x

Hudco Share Price | कट्टर धार्मिक मतदारांचं अभिनंदन, काँग्रेसच्या काळातील अजून एक सरकारी कंपनी मोदी सरकार विकणार, शेअर्स कोसळले

Hudco Share Price

Hudco Share Price | काँग्रेसने ७० वर्षात काय केलं असं म्हणणाऱ्या मोदी सरकारने मागील १० वर्षात काँग्रेसच्या काळातील अनेक कंपन्या विकण्याचा सपाटा लावला. विशेष म्हणजे यातील अनेक कंपन्या प्रचंड नफ्यात देखील असताना असे धक्कादायक निर्णय घेतले जात आहेत. तसेच काँग्रेसच्या काळातील अनेक एअर पोर्ट आणि बंदर हे सध्या गौतम अदाणी यांच्या कंपनीकडे आहेत. आता काँग्रेसच्या काळातील अजून एक कंपनी मोदी सरकार विकणार आहे.

गृहनिर्माण व नगरविकास महामंडळाच्या (हुडको) शेअरमध्ये बुधवारी मोठी घसरण झाली. इंट्राडे ट्रेडमध्ये कंपनीचा शेअर ९ टक्क्यांहून अधिक घसरला आणि ८१.८० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअर्सच्या या घसरणीमागे एक मोठं कारण आहे. गृहनिर्माण व नगरविकास महामंडळातील (हुडको) सात टक्के हिस्सा सरकार विकणार आहे.

ही विक्री किमान ७९ रुपये प्रति शेअर या दराने होणार आहे. ऑफर फॉर सेल अंतर्गत एकूण १४.०१ कोटी शेअर्स म्हणजेच ७ टक्के हिस्सा विकला जाणार आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ही ऑफर बुधवारी खुली होणार आहे.

तपशील काय आहे?
किरकोळ गुंतवणूकदार गुरुवारी हुडकोच्या शेअर्ससाठी बोली लावू शकतात. हुडकोतील सात टक्के हिस्सा ७९ रुपयांना विकल्यास मोदी सरकारच्या तिजोरीला सुमारे एक हजार कोटी रुपये मिळतील. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, “नॉन-रिटेल गुंतवणूकदारांसाठी हुडकोमध्ये विक्री ऑफर बुधवारी सुरू होईल. किरकोळ गुंतवणूकदार गुरुवारी बोली लावू शकतात. ”

अतिरिक्त निविदा प्राप्त झाल्यास सरकार 7 टक्के हिस्सा विनिवेश करेल, ज्यात 3.5 टक्के अधिक हिस्सा विकण्याच्या पर्यायाचा समावेश आहे. ७९ रुपयांची किमान किंमत मंगळवारी हुडकोच्या शेअर्सच्या बंद किमतीपेक्षा १२ टक्क्यांनी कमी आहे. बीएसईवर हुडकोचा शेअर ०.३६ टक्क्यांनी वधारून ८९.९२ रुपयांवर बंद झाला.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Hudco Share Price NSE 18 October 2023.

हॅशटॅग्स

Hudco Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x