5 February 2023 10:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Share Price | हिंडेनबर्गमुळे अदानी ग्रुप हादरला, एलआयसी शेअर्सला सुद्धा मोठा फटका बसणार? तुमचे पैसे बुडणार? Gold ETF Investment | गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक, मिळतील अनेक फायदे आणि वेगाने संपत्ती वाढेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जबरदस्त कोसळले, रविवारी खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील आजचे नवे दर पहा My Salary Slip | पगारदार व्यक्ती आहात? तुमच्या पगाराच्या स्लिपमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असतो माहिती आहे? लक्षात ठेवा Vodafone Idea Share Price | भारत सरकार 'व्होडाफोन आयडिया' मध्ये सर्वात मोठी गुंतवणुकदार, शेअरचं पुढे काय होणार? Horoscope Today | 05 फेब्रुवारी 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Paytm Share Price | पेटीएम शेअरमध्ये पडझड, कंपनी प्रोफीटेबल होईल? गुंतवणूकदारांनी काय करावे?
x

SIP Calculator | म्युचुअल फंड SIP मध्ये दरमहा 1000 रुपये गुंतवा, 2 कोटीचा बंपर परतावा कसा मिळेल ते गणित समजून घ्या

SIP Calculator

SIP Calculator| श्रीमंत होण्याचे सर्वात सोपे मार्ग म्हणजे बचत आणि गुंतवणूक. आपल्या मासिक उत्पन्नातून काही रक्कम बचत करून जर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर दीर्घकाळात तुमच्या कडे खूप मोठा निधी जमा होऊ शकतो. जर तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये थेट गुंतवणूक करण्यास घाबरत असाल, किंवा जोखीम घेण्यास इच्छुक नसाल तर बाजार अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध जे तुमचे पैसे दुप्पट आणि तिप्पट प्रमाणत वाढवू शकतात.

जर तुम्हालाही चांगल्या ठिकाणी पैसे गुंतवून करोडपती व्हायचे असेल तर म्युच्युअल फंड SIP हा तुमच्यासाठी योग्य पर्याय राहील. म्युचुअल फंड SIP च्या माध्यमातून दीर्घकाळासाठी नियमित गुंतवणुक करून लखपती होण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल. म्युच्युअल फंड SIP मध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणुक करण्याचा फायदा म्हणजे त्यात तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा मिळतो आणि तुमची गुंतवणूक रक्कम दीर्घकाळात अनेक पटींनी वाढते. तुम्हाला जर तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित बनवायचे असेल तर तुम्ही म्युचुअल फंड SIP मध्ये बिनधास्त गुंतवणूक सुरू करू शकता. म्युचुअल फंड SIP मध्ये गुंतवणुक जितक्या लवकर सुरू कराल आणि जितक्या जास्त काळासाठी गुंतवणूक करत राहाल, तितका जास्त परतावा मिळतो.

मासिक 1000 SIP वर मिळणारा परतावा :
छोटी पण नियमित गुंतवणुक करून कोणीही मोठा निधी जमा करू शकतो, हे म्युचुअल फंड SIP च्या माध्यमातून सिद्ध होते. या लेखात आम्ही तुम्हाला छोटी गुंतवणुक करून मोठा परतावा कसा मिळवायचा हे एका सोप्या उदाहरणाने सांगणार आहोत. 1,000 रुपयांची मासिक गुंतवणूक करून तुम्ही किती परतावा मिळवू शकता याची गणना करूया. दर महिन्याला 1000 रुपये बचत करणे अशक्य गोष्ट नाही. तुम्ही म्युच्युअल फंडात SIP च्या माध्यमातून दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करू शकता. 1,000 दर महिन्याला नियमित गुंतवणूक करत राहिल्यास दीर्घकाळात तुम्ही करोडपती होण्याचे उद्दिष्ट पूर्ण करू शकता. फक्त 1000 रुपये दरमहा जमा करून 2 कोटी रुपये परतावा कसा मिळू शकतो? चला तर मग एका सोप्या हिशोबाने जाणून घेऊ. दोन कोटी परतावा मिळवण्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडात SIP माध्यमातून दर महिन्याला 1000 रुपये जमा करावे लागतील. मागील काही वर्षांची आकडेवारी पहिली तर आपल्याला समजेल की, म्युच्युअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना नियमित गुंतवणुकीवर वार्षिक सरासरी 20 टक्के परतावा दिला आहे.

दरमहा 1000 रुपये 20 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास किती परतावा मिळेल?
दोन कोटीचा परतावा मिळवण्यासाठी तुम्हाला दरमहा 1,000 रुपये म्युचुअल फंड SIP मध्ये जमा करावे लागतील. 20 वर्षांसाठी नियमित गुंतवणुक कर राहिल्यास तुमची एकूण गुंतवणूक रक्कम 2.4 लाख रुपये जमा होईल. तुमचा म्युचुअल फंड वार्षिक सरासरी 15 टक्के परतावा देत असेल तर वीस वर्षात तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 15 लाख 16 हजार रुपये होते. जर तुमचा म्युचुअल फंड वार्षिक सरासरी 20 टक्के परतावा देत असेल तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 31.61 लाख रुपये होईल.

दरमहा 1,000 रुपये गुंतवणुकीवर जर तुमचा म्युचुअल फंड 30 टक्के सरासरी वार्षिक परतावा देत असेल तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वीस वर्षात 86.27 लाख रुपये होते. जर तुम्ही हा कालावधी 30 वर्ष ठेवला आणि नियमित गुंतवणूक केली तर 20 टक्के सरासरी वार्षिक व्याजदराने तुमच्याकडे 2 कोटी 33 लाख 60 हजार रुपये जमा होईल. गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा मिळतो. म्युचुअल फंड SIP ही गुंतवणूकीची एक सुलभ पद्धत आहे, ज्यात तुम्हाला दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवणूक करण्याची सुविधा दिली जाते. चक्रवाढ व्याज पद्धतीने म्युचुअल फंड मधील गुंतवणूक अनेक पटींनी वाढते आणि गुंतवणूकदारांना चांगला नफा कमावत येतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual fund SIP Calculator investment in SIP fund for long term to earn huge returns on 06 October 2022.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(172)#SIP Calculator(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x