
Mutual Fund SIP | प्रत्येक व्यक्ती गुंतवणुकीसाठी एक असा गुंतवणुकीचा पर्याय शोधत असतो ज्यामध्ये सुरक्षिततेची हमी आणि परताव्याची देखील 100% हमी मिळते. त्याचबरोबर बरेच गुंतवणूकदार दीर्घकाळात जास्तीत जास्त परतावा मिळवून देणाऱ्या म्युच्युअल फंडांच्या शोधात असतात. तुम्हाला कोटींच्या घरात पैसे कमवायचे असतील तर, तुमच्यासाठी एसआयपी म्युच्युअल फंड योजना अत्यंत फायद्याची ठरेल.
मागील दहा वर्षांपासून वेगवेगळ्या म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांना कोटींच्या घरात परतावा मिळवून दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची साखळी वाढतच चालली आहे. प्रत्येक व्यक्तीला आपले फायनान्शियल स्टेटस सुधारायचे असते. त्यामुळे तो म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडतो. तुम्ही कमीत कमी म्हणजेच 4,000 रुपयांच्या एसआयपीतून देखील 2.2 कोटी रुपयांचा निधी तयार करू शकता.
4000 रुपयांची गुंतवणूक किती वर्षांसाठी करावी लागेल :
तुम्हाला कोटींच्या घरात पैसे कमवायचे असतील तर, सर्वप्रथम बाजारात कोणकोणते म्युच्युअल फंड सर्वाधिक परतावा देत आहेत त्याचबरोबर मोठ्या संख्येने ज्या फंडात गुंतवणूकदार पैसे गुंतवत आहेत तो फंड निवडायचा आहे. तुम्हाला एसआयपी करून 4,000 प्रत्येक महिन्याला गुंतवायचे आहेत. ही गुंतवणूक तुम्हाला पुढील 30 वर्षापर्यंत सुरू ठेवायची आहे.
तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर अंदाजित परतावा 14% दराने मिळत आहे असं समजूया. समजा तुम्हाला खरोखरच 14% वार्षिक व्याजदर मिळाले तर 30 वर्षांत 4,000 रुपयांच्या SIP मधून तुम्ही 2.2 कोटी रुपयांचा निधी तयार करू शकाल.
महत्त्वाचं :
कोणत्याही प्रकारचा म्युच्युअल फंड हा शेअर बाजारातील जोखीमेशी निगडित असतो. त्यामुळे या फंडांमध्ये एसआयपीद्वारे गुंतवलेले पैसे निश्चित असले तरीसुद्धा मिळणारा परतावा मात्र निश्चित नसतो. तुम्हाला मिळणारा परतावा शेअर बाजारातील चढ उतारांवर आधारित असतो. त्यामुळे कोणत्याही म्युच्युअल फंडात एसआयपी करताना तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला नक्की घ्या.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.