 
						Mutual Fund Investment | अनेकदा असे दिसून येते की मूलभूत आर्थिक ज्ञान नसल्यामुळे लोक त्यांचे निवृत्तीनंतरचे जीवन आर्थिकदृष्ट्या खूप हलाखीत जगतात. अशा परिस्थितीत वृध्द वयात जीवनाच्या या टप्प्यावर त्यांना अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. तुम्हाला जर निवृत्तीनंतरचे आयुष्य सुरक्षित करून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र जीवन जगायचे असेल, तर तुम्हाला अत्यंत हुशारीने गुंतवणूक करायला हवी. या लेखात, आज आम्ही तुम्हाला एक अश्या जबरदस्त लॉन्ग टर्म म्युच्युअल फंड योजनेबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही मासिक 10 हजार रुपये गुंतवणूक करू शकता आणि मॅच्युरिटीच्या वेळी 31.4 कोटी रुपयांचा भरघोस परतावा मिळवू शकता. मागील काही वर्षांत म्युच्युअल फंड गुंतवणुकीबाबत लोकांची क्रेझ आणि लोकप्रियता खूप वाढली आहे. या लेखात आपण म्युचुअल फंड बद्दल सविस्तर जाणून घेऊया.
चांगला म्युच्युअल फंड निवडा :
गुंतवणूक करून एक चांगला परतावा मिळवण्यासाठी तुम्हाला चांगला म्युच्युअल फंड एसआयपी निवडावा लागेल, आणि पुढील 40 वर्षांपर्यंत दरमहा दहा हजार रुपये नियमित गुंतवणूक करावी लागेल. कोणत्याही म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर दरवर्षी चक्रवाढ व्याज पद्धतीने 15 टक्के अंदाजे व्याज परतावा मिळत राहील.
31.4 कोटी रुपये परतावा :
म्हणजेच तुम्ही पुढील 40 वर्षे दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर चक्रवाढ पद्धतीने दरवर्षी अंदाजे 15 टक्के व्याज परतावा मिळेल. या 40 वर्षांनंतर योजना मुदत मॅच्युरिटीच्या वेळी, तुम्हाला परतावा म्हणून 31.4 कोटी रुपये मिळतील.
या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्यावर तुम्ही निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि आनंदी आयुष्य जगू शकता. या व्यतिरिक्त, या पैशाच्या मदतीने, तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न खर्च, त्यांचे शिक्षण खर्च किंवा भविष्याशी संबंधित इतर महत्त्वाची उद्दिष्टे सहज पूर्ण करू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		