14 April 2024 12:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Force Gurkha | फोर्सची गोरखा SUV लाँचिंगसाठी सज्ज, थेट जिम्नी, थार सारख्या वाहनांशी स्पर्धा करणार, फीचर्स जाणून घ्या SBI Amrit Kalash Scheme | SBI बँकेची खास FD योजना, मिळेल वार्षिक 7.60 टक्के व्याज, बचतीसाठी बँकेत लाईन KTM RC 200 | लोकप्रिय KTM मोटरसायकलवर 5 वर्षांची वॉरंटी, रोड साइड असिस्टन्स सर्व्हिस फ्री Mangal Rashi Parivartan | मंगळ राशीपरिवर्तनाने 'या' 4 राशींचे भाग्य चमकणार, तुमची नशीबवान राशी आहे का? SBI Mutual Fund | एसबीआयची प्रसिद्ध म्युच्युअल फंड योजना, दरमहा 5000 रुपयांची SIP देईल 49 लाख रुपये Royal Enfield | रॉयल एनफिल्ड प्रेमींसाठी खुशखबर! कंपनी 'या' 3 नवीन बाईक्स लाँच करणार, फीचर्स डिटेल्स जाणून घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! DA नंतर HRA वाढीचा निर्णय, पगारात 12600 रुपयांची वाढ होणार
x

Mutual Fund SIP | हे आहेत पैसा वेगाने वाढवणारे मल्टिबॅगर म्युच्युअल फंड, एसआयपीने दिला 12 लाखांचा भरघोस परतावा, नावं सेव्ह करा

Mutual fund SIP

Mutual Fund SIP | म्युचुअल फंड SIP योजना आपल्याला इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची एक सुरक्षित आणि सोपी संधी उपलब्ध करून देते. SIP मध्ये गुंतवणूक केल्याने, गुंतवणूकदाराला दीर्घकाळात चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा मिळतो, ज्यामुळे दीर्घकाळात आपली गुंतवणूक कित्येक पटींनी वाढते. आज या लेखात आपण अश्याच काही म्युचुअल फंड योजना आढावा घेणार आहोत.

टॉप म्युच्युअल फंड:
म्युचुअल फंड मधील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP योजनेद्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूकीचा ओघ सातत्याने वाढताना दिसत आहे. यामध्ये तुमची गुंतवणूक पूर्णतः बाजाराच्या कामगिरीच्या अधीन असते. कारण शेअर बाजारातील चढ-उतारांचा म्युचुअल फंडमधील गुंतवणुकीवर अप्रत्यक्ष परिणाम होतो. SIP योजना इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा एक सुनियोजित मार्ग मानला जातो. म्युचुअल फंड SIP मध्ये गुंतवणूक केल्याने, गुंतवणूकदाराला दीर्घ काळात चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा मिळतो, ज्यामुळे आपले गुंतवणूक मूल्य अनेक पटींनी वाढते. म्युच्युअल फंड तज्ञ आणि गुंतवणूकदार सामान्यतः लोकांना नियमित गुंतवणूक करण्याचा आणि संयम राखण्याचा सल्ला देतात.

काही वर्षात दुप्पट परतावा :
इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केल्यावर चक्रवाढ व्याज पद्धतीने दिला जातो, आणि गुंतवणुकीतून फायदा होत आहे हे कळण्यास दीर्घ कालावधी लागू शकतो. इक्विटी मार्केट हायब्रीड आणि डेट फंडांपेक्षा मोठे फंड तयार करण्यास सक्षम असते. मात्र, बाजारात सध्या सुरू असलेल्या चढ उतारामुळे योग्य तो परतावा मिळण्यास थोडा वेळ लागू शकतो. या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही इक्विटी फंडांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये दरमहा दहा हजार रुपयांची एसआयपी गुंतवणूक केल्यास पाच वर्षांत तुमच्याकडे बारा लाखाचा निधी तयार होईल. दरमहा 10 हजार रुपयांची SIP गुंतवणूक करून तुम्ही पुढील पाच वर्षात 6 लाख रुपये ची गुंतवणूक करून 12 लाख रुपयेचा परतावा कमवू शकता.

चला तर मग अश्याच काही भरघोस परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंडचा आढावा घेऊ :

1) क्वांट अॅक्टिव्ह डायरेक्ट-ग्रोथ फंड :
हा म्युचुअल फंड सुरू झाल्यापासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 14.10 टक्के वार्षिक परतावा देत आहे. ह्या म्युचुअल फंडने आपल्या गुंतवणूकदारांना दे वार्षिक सरासरी 21.08 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या म्युचुअल फंड मध्ये 10 हजार रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली असती, तर आज तुमचे गुंतवणूक मूल्य 12.72 लाख रुपये झाले असते. या फंडाने मागील पाच वर्षांत 30.62 टक्के या वार्षिक दराने परतावा मिळवून दिला आहे.

2) क्वांट मिड कॅप डायरेक्ट-ग्रोथ फंड :
क्वांट मिड कॅप डायरेक्ट-ग्रोथ फंडने स्थापनेपासून आतापर्यंत दरवर्षी 17.46 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. एका वर्षापूर्वी या म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी आता 23.56 टक्के परतावा कमावला आहे. जर पाच वर्षांपूर्वी आपण दर महिन्याला 10,000 रुपयांची एसआयपी गुंतवणूक सुरू केली असती, तर पाच वर्षांत आपल्याला 12.83 लाख रुपयांपर्यंत नफा झाला असता. कारण या एसआयपी गुंतवणुकीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी वार्षिक 30.97 टक्के सरासरी परतावा कमावला आहे.

3) पीजीआयएम :
इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटीज डायरेक्ट-ग्रोथ फंड यात एसआयपी गुंतवणूक करणाऱ्यां लोकांना मागील पाच वर्षांत 31.40 टक्के इतका भरमसाठ दराने परतावा मिळाला आहे. पाच वर्षांपूर्वी, ह्या म्युच्युअल फंड मध्ये मासिक 10,000 रुपये एसआयपी गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला आता 12.96 लाख रुपये पेक्षा अधिक परतावा मिळाला असणार.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News title| Mutual fund SIP investment opportunities in Quant growth funds on 16 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x