
Mutual Fund SIP | SIP म्हणजेच ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ हा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा एक अत्यंत सोपा मार्ग आहे. आतापर्यंत बहुतेक व्यक्तींनी वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांचा एसआयपी माध्यमातून गुंतवणूक केली आहे. SIP गुंतवणुकीचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अगदी लहान गुंतवणूकदार देखील गुंतवणुकीचे नियोजन करू शकतो. त्याचबरोबर आणखीन एक फायदा म्हणजे तुम्हाला शिस्तबद्ध गुंतवणुकीची सवय लागते.
एसआयपी गुंतवणुकीबद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या :
SIP गुंतवणुकीमध्ये तुम्ही तीमाही त्याचबरोबर मासिक आधारावर गुंतवणूक सुरू ठेवू शकता. त्याचबरोबर एसआयपीमधील गुंतवणूक ही फ्लेक्सिबल असते. फ्लेक्झिबल म्हणजेच तुम्ही यामध्ये तुमच्या आर्थिक बजेटनुसार गुंतवणूक करू शकता. एसआयपी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची रक्कम संबंधित व्यक्तीच्या खात्यातून आपोआप जमा होत असते. याला ऑटो डेबिट असे म्हणतात.
भविष्यातील नियोजन महत्त्वाचे :
सध्या गुंतवणुकीबाबत जागृतीचे प्रमाण वाढतच चालले आहे. प्रत्येक व्यक्ती आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य म्युच्युअल फंड आणि निश्चित परतावा मिळवून देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. तुम्हाला देखील 1 कोटी रुपयांचा निधी जमा करून ठेवायचं असेल, SIP म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा पर्याय तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.
असा तयार होईल 1 कोटी रुपयांचा निधी :
1. एसआयपी गुंतवणूक आपल्याला वार्षिक आधारावर 12% परतावा मिळवून देते. त्यामुळे पुढील कॅल्क्युलेशन हे 12% आधारावर असणार आहे.
2. गुंतवणुकीचा कालावधी : 40 वर्षे
3. मासिक गुंतवण : 1000
4. मिळणारा अंदाजीच वार्षिक परतावा : 12%
5. गुंतवलेली एकूण रक्कम : 4.80 लाख
6. मिळणारा अंदाजित परतावा : 1,14,02,420
7. मॅच्युरिटीवर मिळणारा परतावा : 1,18,82,420 रुपये.