
SIP Schemes | आजकाल म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे, कारण योजना गुंतवणुकदारांना अल्पावधीत जबरदस्त परतावा देतात, सोबत यात बचत ही होते. पण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांना कोणत्या फंडात गुंतवणूक करावी असा प्रश्न पडत असेल. असे अनेक म्युचुअल फंड आहेत जे अल्पावधीत पैसे दुप्पट करतात, मात्र त्यात गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. आज लेखात आम्ही तुम्हाला 4 म्युच्युअल फंड योजनांची माहिती देणार आहोत, ज्याच्या ज्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्सनी आपल्या गुंतवणुकदारांना सर्वोत्तम परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनाना दिग्गज ग्लोबल गुंतवणूक एजन्सींकडून टॉप रेटिंगही देणेत आले आहेत. चला तर मग जाणून घेऊ या चार फंडांबद्दल अधिक माहिती
कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड :
स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये कॅनरा बँक रोबेको म्युचुअल फंड योजनेला CRISIL ने प्रथम क्रमांकावर ठेवले आहे. या म्युचुअल फंडाने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 8.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 37.48 टक्के परतावा कमावून दिला आहे. कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंडाच्या होल्डिंग्समध्ये सिटी युनियन बँक, सेरा सॅनिटरीवेअर, केईआय इंडस्ट्रीज, कॅन फिन होम्स इत्यादी कंपनीचे शेअर सामील आहेत. या म्युचुअल फंडारील 55 टक्के पैसे स्मॉल कॅप्स कंपनीच्या शेअर्स मध्ये लावले जातात. या म्युचुअल फंडाच्या एकूण एक्सपोजरपैकी 95 टक्के गुंतवणूक इक्विटी शेअर्समध्ये आहे. ही स्कीम केवळ उच्च जोखम घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आहे.
अॅक्सिस मिडकॅप फंड :
मॉर्निंगस्टारने या म्युचुअल फंडाला 5 स्टार रेटिंग दिली आहे. नावाप्रमाणेच हा म्युचुअल फंड मुख्यतः मिडकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावतो. लार्ज कॅप म्युच्युअल फंड योजनांच्या तुलनेत मिड कॅप म्युचुअल फंड मध्ये जोखीम कमी असते. व्हॅल्यू रिसर्च फर्मनेही या म्युचुअल फंडाला 5 स्टार रेटिंग दिले आहे. या म्युचुअल फंडात तुम्ही 500 रुपये जमा करून SIP गुंतवणूक सुरू करु शकता. या फंडाने आयसीआयसीआय बँक, चोलामंडलम, ट्रेंट, इंडियन हॉटेल्स इत्यादी कंपनीच्या शेअर मध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. या फंडाने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 18.94 टक्के परतावा कमावून दिला आहे. साधारणपणे ही म्युचुअल फंड स्कीम दीर्घ काळात जास्त परतावा देऊ शकते, आणि SIP पद्धतीने गुंतवणूक करून यातील जोखीम अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित केली जाऊ शकते.
एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंड :
या म्युचुअल फंड योजनेला CRISIL ने 5-स्टार रेटिंग दिली आहे. फ्लेक्सी कॅप म्युचुअल फंड विविध मार्केट कॅपिटलायझेशन असलेल्या कंपन्यांमध्ये पैसे लावतात. सामान्यत: लार्ज कॅप स्टॉकमध्ये या म्युचुअल फंडाचे अधिक एक्सपोजर असते. तुम्ही एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडमध्ये फक्त 100 रुपये जमा करून एसआयपी गुंतवणूक सुरू करु शकता. वार्षिक आधारावर या म्युचुअल फंडाने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 19 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना 11.91 टक्के परतावा कमावून दिला आहे. या फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये ICICI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, HDFC बँक आणि NTPC या सारख्या दिग्गज कंपनीच्या शेअर्सचा समावेश करण्यात आला आहे.
क्वांट स्मॉल कॅप म्युचुअल फंड :
स्मॉल कॅप श्रेणीमध्ये सर्वात प्रसिद्ध म्युचुअल फंड म्हणजे क्वांट स्मॉल कॅप फंड. या म्युचुअल फंड स्कीमला व्हॅल्यू रिसर्च आणि मॉर्निंगस्टारने 5 स्टार रेटिंग दिली आहे, तर CRISIL ने या म्युचुअल फंड योजनेला क्रमांक 1 वर ठेवले आहे. क्वांट स्मॉल कॅप फंडाने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 52 टक्के परतावा कमावून दिला आहे. क्वांट स्मॉल कॅप म्युचुअल फंडात एसआयपी पद्धतीने गुंतवणूक करणाऱ्या लोकांना मागील तीन वर्षांत सरासरी वार्षिक 50 टक्के परतावा मिळाला आहे. या म्युचुअल फंडाने ITC, IRB इन्फ्रा, RBL बँक या सारख्या कंपनीच्या शेअर्स मध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. या म्युचुअल फंडाने आपल्या श्रेणीतील इतर म्युचुअल फंड योजनाच्या तुलनेत बंपर परतावा कमावून दिला आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही म्युचुअल फंड खूप फायद्याची आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.